सचिन तेंडुलकरच्या विमानाची आपत्कालीन लॅंडींग(फोटो-सोशल मीडिया)
Plane Emergency Landing : भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला एका थरारक अनुभवायला सामोरे जावे लागले आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर तो जगभर फिरत राहतो. तो वर्षभर भारतातून वेगवेगळ्या देशात सफरीला जात असतो. अशाच एका सफारी दरम्यान सचिन तेंडुलकरला या काळात एक थरारक अनुभव अलया होता. शुक्रवारी सचिन तेंडुलकरकडून सोशल मीडियावर एक मनोरंजक किस्सा शेअर करण्यात आला आहे. सचिन २०२३ मध्ये केनियातील मसाई माराला भेट देण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचे छोटे विमान मसाई माराच्या वादळाचा फटका बसल्याने आपत्कालीन लॅंडींग करावे लागले होते. त्यावेळी तो सहकुटुंब फिरायला गेला होता.
हेही वाचा : IND-PAK सामन्याला माजी क्रिकेटपटूचा जोरदार सपोर्ट! म्हणाला.,”या सामन्याला राजकारणापासून दूर..
सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तेंडुलकर म्हणतो की “आम्ही विमानाच्या आत असताना समोरून येणारे वादळ आम्हाला दिसत होते. आम्हाला जिथे वादळ दिसत आहे तिथेच उतरवावे लागले. आम्ही धावपट्टीपासून सुमारे दोन मैल अंतर दूर होतो, परंतु खराब हवामानामुळे लँडिंग करणे शक्य होऊ शकले नाही. तो पुढे म्हणाला की पर्यायी धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न तेव्हा करण्यात आला, परंतु त्यावेळी तेथे जंगली जनावरे होती. त्यांना पळवून लावण्यासाठी, आम्ही दोन वेळा विमान उतरवले आणि नंतर परत वर उड्डाण करण्यात आले. अखेर धावपट्टी मोकळी झाली आणि आम्ही सुरक्षितपणे उतरण्यात यशस्वी झालो. तथापि, मोठा अपघात टळला.सचिन तेंडुलकरकडून हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया हँडलवर २ वर्षांनी शेअर करण्यात आला.
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने गुरुवारी बीसीसीआयचा पुढचा अध्यक्ष म्हणून त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली होती. परंतु, या सर्व चर्चा त्याने फेटाळून लावल्या आहे. तेंडुलकरच्या व्यवस्थापन फर्मकडून तेंडुलकरच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. या चर्चांना त्यामध्ये “पूर्णपणे निराधार” असे म्हटले. व्यवस्थापन फर्मकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बीसीसीआय अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकरची नियुक्ती झाल्याबद्दल काही माध्यमे आणि अफवा पसरत असल्याचे आमच्या निदर्शनासआले आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की यामध्ये काही एक तथ्य नाही. आम्ही सर्व संबंधित पक्षांना तसेच माध्यमांना या निराधार अनुमानांकडे लक्ष देऊ नये असे आवाहन करत आहोत.”