Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पान विक्रेत्याच्या मुलाने भारताला मिळवून दिले पहिले पदक, राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले रौप्य

सुनील नाईक म्हणाले की, संकेतने २०१७ पासूनच राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी सुरू केली होती. यादरम्यान सुनील प्रशिक्षक मयूरसोबत दिवसातून सात तास सराव करायचा. यानंतर त्याची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने तयारी केली.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 30, 2022 | 07:45 PM
पान विक्रेत्याच्या मुलाने भारताला मिळवून दिले पहिले पदक, राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले रौप्य
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – वडिलांसोबत पान विकणाऱ्या संकेत सरगरने राष्ट्रकुल स्पर्धेत देशाला पहिले पदक मिळवून दिले आहे. वेटलिफ्टिंगच्या ५५ ​​किलो वजनी गटात त्याने रौप्य पदक जिंकले. संकेतचे वडील महादेव सरगर हे महाराष्ट्रातील सांगलीच्या मुख्य बाजारपेठेत पान आणि चहाचे दुकान चालवतात. त्यांच्या या कामात संकेत सुद्धा मदत करतो.

सांगली जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुनील नाईक यांनी सांगितले की, संकेत २०१३ पासून वेटलिफ्टिंग करत आहे. तो जिल्हा प्रशिक्षक मयूर सिंहासने यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. संकेतचे वडील सांगली शहरातील मुख्य चौकात चहा आणि पानाची छोटी टपरी चालवतात. संकेतला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. त्याच्या धाकट्या बहिणीनेही काजल सरगरने खेलो इंडिया कॉमनवेल्थ गेम्समध्ये महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक पटकावले आहे.

सुनील नाईक म्हणाले की, संकेतने २०१७ पासूनच राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी सुरू केली होती. यादरम्यान सुनील प्रशिक्षक मयूरसोबत दिवसातून सात तास सराव करायचा. यानंतर त्याची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने तयारी केली. संकेतने गतवर्षी वर्ल्ड चॅम्पियनमध्येही देशासाठी रौप्य पदक जिंकले आहे.

संकेतला बर्मिंगहॅममध्ये सुवर्णपदकाची आशा होती. प्रशिक्षक मयूरने सांगितले की, त्याला सुवर्णाची आशा होती. २४८ किलो वजन उचलून तो जेव्हा टॉपवर चालत होता तेव्हा सोन्याची आशा पूर्ण होताना दिसत होती, पण अंतिम वजन उचलताना त्याच्या हाताला दुखापत झाली. प्रशिक्षकाने दिव्य मराठीला सांगितले की, त्याला गंभीर दुखापत होऊ नये म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. वडील महादेव सरगर यांनीही आम्हाला मुलाच्या दुखापतीची चिंता असल्याचे सांगितले. मुलाने पदक जिंकून आमचे नाव कमावले आहे.

Web Title: Prepared for weightlifting for 9 years won silver medal in commonwealth games

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2022 | 07:45 PM

Topics:  

  • commonwealth games

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.