Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL गाजवणाऱ्या प्रियांश आर्यने DPL मध्येही घातला धुमाकूळ! रचला ‘हा’ इतिहास; या लीगमध्ये पहिल्यांदाच केला पराक्रम

दिल्लीचा युवा फलंदाज प्रियांश आर्यने आयपीएलमध्ये धुमाकूळ घातला होता. आता त्याने दिल्ली प्रीमियर लीग २०२५ मध्ये शतक ठोकून या लीगमध्ये अनेक शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 09, 2025 | 02:44 PM
Priyansh Arya, who dominated IPL, also created a sensation in DPL! Created 'this' history; First time in this league

Priyansh Arya, who dominated IPL, also created a sensation in DPL! Created 'this' history; First time in this league

Follow Us
Close
Follow Us:

Priyansh Aryan created history in DPL 2025: दिल्लीचा युवा फलंदाज प्रियांश आर्यने आपल्या बॅटची जादू आयपीएल २०२५ मध्ये दाखवून दिली आहे. त्याने या लीगमध्ये पंजाब संघाकडून खेळताना शानदार कामगिरी केली आणि आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं आहे. अशातच आता दिल्ली प्रीमियर लीग २०२५ सूरु आहे. शुक्रवारी दिल्ली प्रीमियर लीग २०२५ च्या १२ व्या सामन्यात आउटर दिल्ली वॉरियर्सकडून खेळताना प्रियांश आर्यने ५२ चेंडूत शतक झळकावून आणखी एक कामगिरी केली आहे. ईस्ट दिल्ली रायडर्सविरुद्ध डावाची सुरुवात करताना, आर्यने फक्त ५६ चेंडूत ७ चौकार आणि ९ षटकारांसह १११ धावा फटकावल्या. अशा प्रकारे, तो डीपीएलमध्ये अनेक शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

साउथ दिल्ली सुपरस्टार्सपासून विलग झाल्यानंतर २४ वर्षीय प्रियांश आर्यने त्याच्या नवीन संघाकडून खेळताना पहिल्या काही सामन्यांमध्ये २६, १६ आणि ८ धावा केल्या. परंतु, त्याने ईस्ट दिल्ली रायडर्सविरुद्ध जोरदार पुनरागमन करत शानदार शतक झळकावले. त्याच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सनत सांगवान लवकर माघारी परतला. त्यानंतर आर्यने करण गर्गसोबत ४६ चेंडूत ९२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. त्याने १७ व्या षटकात आपल्या शतकाला गवसणी घातली.

हेही वाचा : Sachin Tendulkar vs Joe Root ; 158 कसोटी सामन्यांनंतर कोण कोणाच्या पुढे? आकडेवारी पाहून व्हाल चकित

प्रियांश आर्यने ५६ चेंडूंमध्ये १११ दहावा केल्या त्यामध्ये त्याने ९ षटकार आणि ७ चौकारांची आतिषबाजी केली. त्याच्या शतकामुळे आऊटर दिल्ली वॉरियर्सने २० षटकांत ७ गडी गमावून २३१ धावांचा डोंगर उभा केला. तथापि, ईस्ट दिल्ली रायडर्स संघाने आर्यचे शतक वाया घालवून ४ चेंडू शिल्लक असताना सामना आपल्या खिशात टाकला आहे. यासह, ईस्ट दिल्लीने डीपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग करण्याचा पराक्रम देखील केला.

राणा-रावत जोडीमुळे पूर्व दिल्लीचा विजय

ईस्ट दिल्ली रायडर्सची सुरुवात चांगली नव्हती आणि संघ ५१/३ अशा अडचणीत आला.परंतु अर्पित राणा आणि कर्णधार अनुज रावत यांच्या मेहनतीने सामना फिरवला. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी १३० धावांची शानदार भागीदारी रचली आणि दबावाखाली आक्रमक फलंदाजी करत लक्ष्याचा पाठलाग करून विजय संपादन केला.

अर्पित राणाने ४५ चेंडूत ७९ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ चौकार आणि ४ षटकारा लगावले. तर कर्णधार अनुज रावतने ३५ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांसह ८४ धावांची स्फोटक तखेळी करत संघाला शानदार विजय सुकर केला.

२०२४ मध्ये प्रियांश आर्यची कामगिरी..

आर्याचा २०२४ चा देशांतर्गत क्रिकेट हंगाम खूप शानदार राहिला आहे. त्याने संपूर्ण हंगामात ६७.५६ च्या सरासरीने आणि २०० च्या आसपासच्या स्फोटक स्ट्राईक रेटने ६०८ धावा केल्या होत्या. ज्यामुळे त्याने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. या दमदार कामगिरीमुळे, २०२५ च्या मेगा लिलावात त्याला पंजाब किंग्जने आपल्या संघात सामावून घेतले होते.

हेही वाचा : CSK सोडल्याबद्दल अश्विनची प्रतिक्रिया व्हायरल, संजू सॅमसनला हसू आवरेना; Video Viral

आर्याला आयपीएल २०२५ मध्ये त्याने आपल्या पदार्पणाच्या हंगामात त्याने फलंदाजीने आपली क्षमता सिद्ध केली. त्याने १७ डावात १७९.२५ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने ४७५ धावा फटकावल्या. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याने १०३ धावां काढल्या तर त्यानंतर कारकिर्दीतील सर्वोत्तम १४१ धावांची खेळी साकारली. त्याच्या फलंदाजीने पंजाब किंग्जला अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Web Title: Priyansh arya created a sensation in dpl created this history first time in this league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • Priyansh Arya

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.