राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया)
वर्धा येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या (Pune) सभागृहात सुरू असलेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यांमध्ये महिला गटात पुण्याच्या पृथा वर्टीकर हिने कोल्हापूरच्या निहाली पाटीलचा ११-८, ११-२, ११-४ असा सरळ तीन गेममध्ये पराभव केला. पुण्याच्या स्वरदा साने हिनेही अमरावतीच्या प्रियांका अर्दकवर ११-१, ११-२, ११-२ असा एकतर्फी विजय मिळविला.महिला गटातील चुरशीच्या सामन्यात पुण्याच्या रुचिता दारवटकर हिने मुंबई शहरच्या अंशिता ताम्हणकर हिचा कडवा प्रतिकार मोडून काढत ८-११, ११-९, ११-३, ६-११, ११-९ असा संघर्षपूर्ण विजय नोंदविला.
पुरुष गटात पुण्याच्या शौरेन सोमण याने मुंबई शहरच्या आदित्य दलालवर ११-०, ११-५, १२-१० असा सरळ तीन गेममध्ये विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.पुण्याच्या भार्गव चक्रदेव याला नागपूरच्या पूरब सिंग रेणू याने कडवी झुंज दिली. मात्र, चुरशीच्या लढतीत भार्गवने ७-११, ११-९, ९-११, ११-४, ११-९ असा विजय मिळवत आपली आगेकूच कायम ठेवली.पुण्याच्या ईशान खांडेकर याने ठाण्याच्या कीर्ती विकमानीचा ११-४, ११-४, ११-२ असा सरळ तीन गेममध्ये पराभव करून पुढील फेरी गाठली.
Table Tennis सरळ सेटमध्ये एकतर्फी विजय! रुचिता धारवटकर ठरली चॅम्पियन, दिया शिंदेचा तब्बल…
या राज्य मानांकन स्पर्धेत ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुली, तसेच पुरुष व महिला अशा विविध गटांमध्ये सामने खेळविले जात आहेत. राज्यभरातून तब्बल ७६८ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, विविध गटांतील सामने उत्साहात सुरू आहेत.पुण्याच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी करत स्पर्धेत आपली छाप पाडली असून, आगामी फेऱ्यांमध्येही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.






