केएल राहुल (फोटो- सोशल मिडिया)
भारतीय क्रिकेट संघ लवकरच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी सराव आणि फॉर्म मिळवण्यासाठी मैदानात उतरलेल्या केएल राहुल फलंदाजीत अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. दोन्ही डावांमध्ये केएल राहुल अपयशी ठरल्याचे दिसून आले.
केएल राहुल हा भारतीय कसोटी संघाचा एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू समजला जातो. मिडल ऑर्डरमध्ये चांगली धावसंख्या उभी करून त्याने अनेकदा भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्याआधी केएल राहुलचा खराब फॉर्म असणे ही चिंतेची बाब समजली जात आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या केएल राहुलला संघात कायम ठेवण्याबाबत निवडकर्त्यांना विचार करावा लागू शकतो. आगामी दौऱ्यात त्याला संधी दिली जाणार का हे पहावे लागणार आहे. रणजी ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये केएल राहुलला आपला फोरम सिद्ध करावा लागणार आहे. तर त्याची वर्णी भारतीय संघात न्यूझीलंडविरुद्ध लागू शकते.
सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचे सामने रंगले आहेत. यामध्ये आंध्र आणि कर्नाटक यांच्यात एलिट ग्रुप ‘ब’ चा सामना खेळवला जात आहे. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी फॉर्म मिळवण्याच्या प्रयत्नात असलेला टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले. कर्नाटकचा संघ जेव्हा या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा केएल राहुलने डावाची सुरुवात केली. मात्र तो 4 रन्स करून आउट झाला. पहिल्या डावातील अपयशानंतर दुसऱ्या डावातही राहुलची तीच कहाणी पाहायला मिळाली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला केएल राहुल २० बॉल खेळून केवळ १ रन काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.






