फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध झिम्बाब्वे : भारताचा संघ (Team India) मोठ्या विजयासह आता लवकरच भारताचा म्हणजेच मायदेशी परतणार आहे. त्यानंतर आता भारताचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. ही मालिका ६ जुलैपासून सुरु होणार आहे. या संघामध्ये सर्व तरुण खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचे सर्व यंगस्टर दिसणार आहेत. या मालिकेसाठी कर्णधार शुभमन गिल असणार आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे ही मालिका पाच सामान्यांची आयोजित करण्यात आली आहे. या सामान्यांच्या संदर्भात बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये भारताचे खेळाडू आणि प्रशिक्षक झिम्बाब्वेला रवाना झाले आहेत.
टीम इंडियाचे या मालिकेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण हे हेड कोच असणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये रियान पराग, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, आवेश खान, तुषार देशपांडे हे खेळाडू झिम्बाब्वेसाठी रवाना झाले आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण हे फक्त झिम्बाब्वे मालिकेसाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. यानंतर आगामी श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली जाणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अनेक अनकॅप्ड खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, ज्यांनी आयपीएल २०२४ मध्ये चमकदार कामगिरी केली होती.
Jet ✈️
Set 👌
Zimbabwe 🇿🇼#TeamIndia 🇮🇳 | #ZIMvIND pic.twitter.com/q3sFz639z7— BCCI (@BCCI) July 1, 2024
भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून विश्वचषक विजेता झाला. यानंतर भारताचा संघ बार्बाडोसमध्ये काही काळासाठी राहिला. याचे कारण म्हणजेच बार्बाडोसचे हवामान. फायनलचा सामना झाल्यानंतर बार्बाडोसमध्ये मुसळधार पावसासह वादळ सुद्धा आले होते. त्यामुळे तेथील सरकारने विमानतळ बंद करून लॉकडाऊन करण्यात आले होते. आज भारताचा संघ मायदेशी परतणार आहेत. टीम इंडिया दिल्लीसाठी रवाना झाले आहेत, काही तासांमध्ये भारताचा क्रिकेट संघ दिल्लीमध्ये पोहोचणार आहे.
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार , तुषार देशपांडे.