फोटो सौजन्य - सोशल मीडिया
शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी रिअल माद्रिद विरुद्ध गेटाफे यांच्यामध्ये सामना झाला. यामध्ये आता रिअल माद्रिदने गेटाफेवर २-० असा विजय मिळवत स्पॅनिश लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे आपला जागा पक्की केली आहे. शनिवारी रियलसाठी कॅसेमिरोने ३८व्या मिनिटाला आणि लुकास वास्क्वेझने ६८व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय निश्चित केला. या विजयासह रिअलने दुसऱ्या स्थानावर असलेल्या सेव्हिलावर १२ गुणांची आघाडी घेतली आहे. या विजयासह रिअल माद्रिद सामन्यानंतर पहिल्या स्थानावर होता, पण आता बार्सिलोनाचा काल सामना झाला यामध्ये त्यांनी विजय मिळवून ३४ गुणांसह आता पहिल्या स्थानावर उडी मारली आहे.
Massive chance for Mbappe , but he misses ❌
Real Madrid 2-0 Getafe#RealMadtridGetafe
— The Bernabeu Post (@VivekP06196) December 1, 2024
विक्रमी १३ वेळा युरोपियन चॅम्पियन माद्रिद मंगळवारी चॅम्पियन्स लीग उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात गतविजेत्या चेल्सीचे यजमानपद भूषवणार आहे. पहिल्या लेगच्या सामन्यात ३-१ असा विजय मिळवत आघाडी घेतली आहे. अन्य एका सामन्यात ॲटलेटिको माद्रिदला मँचेस्टर सिटीकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या पूर्वार्धापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. उत्तरार्धात मँचेस्टर सिटीच्या डी ब्रुयनने ६९व्या मिनिटाला गोल करून संघाला विजय मिळवून दिला.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
स्पॅनिश लीगच्या गुणतालिकेवर नजर टाकली तर बार्सिलोनाचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर आहे. बार्सिलोनाचे ३४ गुण आहेत, यामध्ये १५ सामने झाले आहेत आणि त्यांनी ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे एक सामना अनिर्णयीत राहिला आहे. दुसऱ्या स्थानावर रिअल माद्रिदचा संघ आहे, रिअल माद्रिदच्या संघाने १४ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर ३ सामने अनिर्णयीत राहिले आहेत आणि १ सामना गमावला आहे.
🔝6⃣ This is how the #LALIGAEASPORTS top six looks after a thrilling weekend! pic.twitter.com/99ohXRwRm4
— LALIGA English (@LaLigaEN) December 1, 2024
या गुणतालिकेमध्ये ऍटलेटिको माद्रिदचा संघ ३२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर चौथ्या स्थानावर ऍथलेटिक क्लबचा संघ आहे. त्याचे १५ सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर ५ सामने अनिर्णयीत राहिले आहेत आणि ३ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पाचव्या आणि सहाव्या अनुक्रमे विलॅरियल आणि मॅलोर्काचा संघ आहे. विलॅरियलचे आतापर्यत २६ गुण आहेत तर मॅलोर्काचे २४ पॉईंट आहेत.