फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबल : सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यामध्ये भारताच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी टीम इंडियाला काही सामने जिंकणे अनिवार्य आहे. भारताच्या संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. आतापर्यंत, टीम इंडिया 2023-25 सायकलच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, परंतु तरीही अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी टीमला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत किती सामने जिंकावे लागतील आणि कोणत्या परिस्थितीत टीम इंडियाला इतर संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून राहावे लागेल.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
स्टार स्पोर्ट्सद्वारे जारी केलेल्या समीकरणानुसार, जर भारताच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय म्हणजे इतर संघांवर अवलंबून न राहता स्थान मिळवायचे असेल, तर 5-0, 4-1, 4-0 किंवा 3-0 ने सामने जिंकणे आवश्यक आहे. या परिस्थितीत टीम इंडिया थेट फायनलसाठी पात्र ठरणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाने जर सुरु असलेली बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे मालिका 3-1 किंवा 3-2 ने जिंकली तर त्यांना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकासारख्या संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून राहावे लागणार आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर करंडक 2-2 असा ड्रॉ केला तरीही त्यांना अंतिम फेरीत जाण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेवर अवलंबून राहावे लागेल.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
आत्तापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन आवृत्त्याचे आयोजन आयसीसीने केले आहे. दोन्ही वेळा टीम इंडियाने फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र, टीम इंडियाने आतापर्यंत एकही फायनल जिंकलेली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. टीम इंडियाला पहिल्यांदा न्यूझीलंडकडून आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील दुसऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. टीम इंडिया दुसरा कसोटी सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारताच्या संघाने पहिल्या कसोटीमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांची नजर दुसऱ्या कसोटीवर आहे, कारण आता भारताच्या प्लेइंग ११ मध्ये देखील बदल होणार आहेत त्याचबरोबर कोणत्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे.