Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs AUS : WTC Final सामन्यात Ahmedabad plane crash मधील मृतांना वाहिली श्रद्धांजली;  खेळाडूंनी बांधल्या काळ्या पट्ट्या.. 

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा फायनल सामना सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघातील सर्व खेळाडूंनी काळ्या पट्ट्या घालून अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 13, 2025 | 06:29 PM
SA vs AUS: Tribute paid to the dead in Ahmedabad plane crash during WTC Final match; Players wore black armbands..

SA vs AUS: Tribute paid to the dead in Ahmedabad plane crash during WTC Final match; Players wore black armbands..

Follow Us
Close
Follow Us:

SA vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा फायनल सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना ११ जूनपासून लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. दुसरीकडे, १२ जून रोजी भारतात एक दुर्दैवी घटना घडली आहे.  गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान अपघात घडला असून विमानातील २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर जगातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच क्रीडा जगतातून देखील या घटनेवर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.  दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियन संघांनी या घटनेवर मैदानातील आपल्या कृतीने भावना व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलिया  आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाने अहमदाबाद विमान अपघात प्रकरणावर संपूर्ण जगासमोर  शोक व्यक्त केला आहे. या दोन्ही संघातील सर्व खेळाडूं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात काळ्या पट्ट्या घालून मैदानावर उतरले आहेत. या सामन्यात  केवळ खेळाडूच नाही तर पंच देखील काळ्या पट्ट्या घालून मैदानावर उतरलेले दिसून आले आहेत, तसेच त्यांनी या कृतीतून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

Australian and South African players wearing black armbands and observed a moment of silence for Ahmedabad plane victims. pic.twitter.com/DEelygZsr8

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 13, 2025

हेही वाचा : WTC 2025 Final : ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने रडवले; कांगारू मजबूत स्थितीत, साऊथ आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांची गरज..

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाच्या या निर्णयाचे जगभरातून, विशेषतः भारतात कौतुक होताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचे लक्ष  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील दुसऱ्या विजयावर आहे, यापूर्वी, २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला हरवून जेतेपदावर नाव कोरले होते.

दक्षिण आफ्रिकेबद्दल  सांगायचे झाल्यास, हा संघ पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासातील हा तिसराच अंतिम सामना आहे. २०२१ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला हरवून पहिले जेतेपद पटकावले होते.

हेही वाचा : SA vs AUS : WTC Final ठरणार अखेरची कसोटी? ऑस्ट्रेलियाचे ‘हे’ दोन दिग्गज घेणार मोठा निर्णय..

सामन्याची स्थिती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने उभे आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा करू शकला. २१२ धावांचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाकडे ७४ धावांची आघाडी मिळाली. त्यापुढे दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्कच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर २०७ धावा केल्या असून  ऑस्ट्रेलियाकडे आता २८१ धावांची आघाडी आहे.  साऊथ आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकायचा असेल तर  २८२ धावा करण्याची गरज होती, त्यातील साऊथ आफ्रिकेच्या दुसऱ्या दवाला सुरवात झाली आहे. साऊथ आफ्रिकेने १ विकेट गमावून ४१ धावा केल्या आहेत. एडेन मार्कराम आणि  वियान मुल्डर ही खेळत आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाल दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना जिंकण्यासाठी ९ विकेट्सची गरज आहे.

Web Title: Sa vs aus players wear black armbands in wtc final to pay tribute to those killed in ahmedabad plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 06:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.