ऑस्ट्रेलिया टीम(फोटो-सोशल मीडिया)
SA vs AUS : ११ जूनपासून लंडनमधील ऐतिहासिक मैदान लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. हा सामना १५ जूनपर्यंत चालणार आहे. आज तिसरा दिवसाचा खेळ सुरू आहे. या दरम्यान, दोन्ही संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया २८१ ची आघाडीसह मजबूत स्थितीत आहे. साऊथ आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकायचा असेल तर २८२ धावा कराव्या लागणार आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी दोन अनुभवी खेळाडू निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : IND Vs END : गौतम गंभीरबाबत वाईट बातमी; इंग्लंडसोडून प्रशिक्षकाने तात्काळ गाठला देश, वाचा सविस्तर..
ज्या दोन अनुभवी खेळाडूंबद्दल निवृत्तीची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये स्टीव्ह स्मिथ आणि नाथन लायन यांची नावे आघाडीवर आहेत. हे दोन्ही खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळत आहेत. असे मानले जाते की, हा या दोन्ही खेळाडूंचा शेवटचा कसोटी सामना ठरण्याची शक्यता आहे. स्टीव्ह स्मिथने यापूर्वीच एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नाथन लायन आता ३७ वर्षांचा आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर तो त्याच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट देखील उत्तम करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : क्रिकेटमध्ये तीन स्टंम्पचं का वापरले जातात? रंजक आहे इतिहास
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा करू शकला. २१२ धावांचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाकडे ७४ धावांची आघाडी मिळाली. त्यापुढे दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्कच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर २०७ धावा केल्या असून ऑस्ट्रेलियाकडे आता २८१ धावांची आघाडी आहे. साऊथ आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकायचा असेल तर २८२ धावा कराव्या लागणार आहेत.
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.