फोटो सौजन्य - jiteshsharma/ sais_1509/harshit_rana_06
भारताचा संघ : आयपीएल २०२४ मध्ये भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. त्याचबरोबर गोलंदाजांनीही दमदार कामगिरी करत चाहत्यांच्या मनात जागा केली आहे. ६ जुलैपासून झिंबाब्वेविरुद्ध भारताची पाच सामान्यांची मालिका सुरु होणार आहे. यासाठी भारतीय युवा खेळाडूंचा संघ झिंबाब्वेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी रवाना झाला आहे. या मालिकेची कमाल शुभमन गिलकडे असणार आहे. त्याचबरोबर भारताचे या मालिकेसाठी तात्पुरते प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण असणार आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावर फोटो शेअर करून यासंदर्भात माहिती शेअर केली आहे.
भारताच्या संघामध्ये ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर अशा अनेक युवा खेळाडूंचा समावेश असणार आहे. आयपीएलच्या कामगिरीवर अनेक खेळाडूंना भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे. झिंबाब्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या खेळाडूंचे भारतीय संघामध्ये पदार्पण होणार आहे. यामध्ये साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांचा T-२० सामना होणार आहे. या तिन्ही खेळाडूंना पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाचा भाग बनवण्यात आले आहे. हर्षित राणाला पहिल्यांदाच टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले आहे.
🚨 NEWS 🚨
Sai Sudharsan, Jitesh Sharma and Harshit Rana added to India’s squad for first two T20Is against Zimbabwe.
Full Details 🔽 #TeamIndia | #ZIMvINDhttps://t.co/ezEefD23D3
— BCCI (@BCCI) July 2, 2024
त्याचबरोबर शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल हे खेळाडू सुद्धा या संघामध्ये होते, हे तीन खेळाडू पहिले दोन सामने खेळणार होते. परंतु विश्वचषक विजेत्या टीम इंडियाला बार्बाडोसहून परतता आलेले नाही, त्यामुळे तिन्ही खेळाडू शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासोबत झिम्बाब्वेला रवाना होऊ शकले नाहीत. अशा तिन्ही खेळाडूंना बदलण्यात आले.
शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा.