Sanju Samson is not in the Indian team for Asia Cup 2025! This time it will come for one reason...
Asia Cup 2025 : भारत नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला आहे. भारतीय कसोटी संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत युवा कर्मधार शुभमन गिलच्या भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. आता भारतीय संघ ९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशिया कप २०२५ च्या तयारीला लागला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून २६ जुलै रोजी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. यूएईमध्ये ही स्पर्धा ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. अद्याप या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच त्याआधी टीम इंडियाचा माजी विकेटकीपर दीप दासगुप्ताकडून एकी विधान करण्यात आले आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाने भारताचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला आशिया कपमध्ये संधी नाकारली जाणार आहे.
हेही वाचा : नवीन क्रीडा विधेयकामुळे बीसीसीआय अध्यक्षांची लागली लॉटरी! सप्टेंबरपर्यंत रॉजर बिन्नी राहणार पदावर
भारताचा स्टार खेळाडू संजू सॅमसन टी २० क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. भारताकडून खेळताना वर्षभरात टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा संजू सॅमसन हा एकमेव फलंदाज आहे. मात या मध्ये एक नकोशी बाब आहे की, संजूने गेल्या ५ टी २० सामन्यांमध्ये ५१ धावा केल्या आहेत. त्यामुळे संजूला आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान देण्याबाबत आता प्रश्न निर्माण झाले आहेत.
दीप दासगुप्ता आशिया कपमधील संघाबाबत बोलताना म्हटला की “संजू सॅमसन याने चांगली कामगिरी केलीय साली तरी भारतात इंग्लंड विरुद्ध त्याला धावांसाठी फार संघर्ष करावा लागला होता. भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली कोणत्याही एका बळकट संघाविरुद्ध खेळलेली ही एकमेव मालिका होती.”
दीप दासगुप्ता पुढे म्हणाला की, “शुबमन गिल हा विराट कोहलीची भूमिका उत्तम बजावू शकतो. शुबमन या अशा स्पर्धेत शेवटपर्यंत खेळून मोठी धावसंख्या उभारण्यास सक्षम आहे. शुबमनला आयपीएलमधील कामगिरीचा फायदा होईल. तसेच यूएईमधील संथ खेळपट्टीत अशा खेळाडूची गरज आहे.”
हेही वाचा : सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच सनई चौघड्यांचा घुमणार आवाज, अर्जुन तेंडुलकरचा ‘गुपचूप’ उरकला साखरपुडा
दीप दासगुप्ता सालामीवीरांबाबत बोलताना म्हणाला की, “अभिषेक शर्मा याने ओपनर म्हणून मैदानात उतराव. अभिषेकमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. मात्र यावेळी यशस्वी जैस्वालला संधी मिळणं अवघड आहे. त्यामुळे निवड समितीला संजू सॅमसन आणि जितेश शर्मा मिडल ऑर्डरमध्ये खेळू शकतात की नाही, हे निश्चित करावं लागणार आहे.”
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, तिलक वर्मा, जितेश शर्मा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर.