फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा संघ काही दिवसांमध्ये आशिया कप खेळताना दिसणार आहे, त्याआधी आशिया कपच्या संघामध्ये सामील झालेला संजू सॅमसन संघाचा भाग आहे. केरळ क्रिकेट लीग २०२५ सुरु आहे, यामध्ये भारताचा फलंदाज आणि विकेटकिपर संजू सॅमसनने कमालीच्या खेळी दाखवल्या आहेत. आशिया कपआधी त्याचा हा फार्म भारताच्या संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरु शकते. तो सध्या केरळ क्रिकेट लीग २०२५ मध्ये संजू कहर करत आहे.
भारतीय निवडकर्त्यांनी आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची निवड केली आहे. जिथे यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन देखील संघात दिसत आहे. तथापि, शुभमन गिलच्या प्रवेशानंतर सॅमसनचे स्थान धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत, आता त्याने या सर्व वृत्तांना बॅटने उत्तर दिले आहे. आशिया कप २०२५ पूर्वी, संजूने १४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने एक शानदार शतक झळकावले आहे. या शतकामुळे त्याच्या संघाने रोमांचक सामना जिंकला आहे.
WDPL 2025 : फायनलच्या सामन्यात साउथ दिल्ली सुपरस्टार्सने 1 धावेने जिंकले जेतेपद! अंतिम सामना ठरला अल्ट्रा प्रो मॅक्स
केरळ क्रिकेट लीग २०२५ मध्ये, कोची ब्लू टायगर्स संघाकडून संजू सॅमसन फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आला. संघ २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. त्यावेळी संजूने प्रथम फक्त १६ चेंडूत अर्धशतक ठोकले. आपला फॉर्म कायम ठेवत सॅमसनने फक्त ४२ चेंडूत शतक ठोकले. या डावात संजूने ५१ चेंडूत १४ चौकार आणि ७ षटकार मारत १२१ धावा केल्या. शेवटी, मोहम्मद आशिकने फक्त १८ चेंडूत ४५ धावा केल्या. कोची संघाला १ चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना, आशिकने षटकार मारून त्याच्या संघाला सामना जिंकून दिला. सॅमसनच्या या खेळीमुळेच त्याचा संघ सामन्यात विजयी झाला.
SANJU SAMSON 121 RUNS FROM JUST 51 BALLS WHILE CHASING 237 RUNS IN KCL 🤯
– One of the Craziest Innings ever in T20 History. pic.twitter.com/J95dKBW8ew
— Johns. (@CricCrazyJohns) August 24, 2025
विकेटकीपर संजू सॅमसन गेल्या काही काळापासून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलामीवीर फलंदाजाची भूमिका बजावत आहे. शुभमन गिलच्या आगमनामुळे त्याचे स्थान धोक्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून अभिषेक शर्माचे स्थान निश्चित झाले आहे, त्यामुळे त्याच्या जोडीदाराचा शोध सुरू आहे. संजूच्या या शतकामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यासाठी अडचणी वाढल्या आहेत. आता गिलला तिलक वर्माच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.