Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत पराभूत! कांस्यकावर मानावे लागले समाधान.. 

 BWF  जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांना चीनच्या खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 01, 2025 | 05:02 PM
Satwik-Chirag pair lost in semi-finals at BWF World Championships! Had to settle for bronze medal..

Satwik-Chirag pair lost in semi-finals at BWF World Championships! Had to settle for bronze medal..

Follow Us
Close
Follow Us:

BWF World Championships 2025 : सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी BWF  जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत च्या क्वार्टर फायनलमध्ये दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांना पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्यामुळे या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चिती करण्यात आली होती. परंतु, उपांत्य फेरीत सात्विक-चिराग जोडी पराभूत होऊन अंतिम फेरीच्या आशा मावळल्या असून कास्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.  सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांना उपांत्य फेरीत त्यांना चीनच्या चेन बो यांग आणि लियू यी या ११व्या मानांकित जोडीकडून १९-२१, २१-१८, १२-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.

 

हेही वाचा : ICC Women’s World Cup मध्ये विजेत्यासह ‘हे’ संघही होणार मालामाल! होणार कोट्यवधी रुपयांचा वर्षाव..

हा खेळ  ६७ मिनिटांच्या या चुरशीच्या सामन्यात भारतीय जोडीने चांगली सुरुवात केली होती, पण निर्णायक गेममध्ये ते पूर्णपणे दबावाखाली आले. सात्विक आणि चिरागसाठी हे जागतिक स्पर्धेतील दुसरे कांस्य पदक ठरले. यापूर्वी त्यांनी २०२२ मध्येही कांस्य पदक जिंकले होते. क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी मलेशियाच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांचा पराभव करून भारतासाठी पदक निश्चित केले होते.

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये ९-३ अशी आघाडी घेतली होती. मात्र चिनी जोडीने जबरदस्त पुनरागमन करत गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सात्विकच्या ताकदवान स्मॅशेस आणि चिरागच्या नेटवरील खेळाने भारताने गेम जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये मात्र चीनी खेळाडूंच्या अचूक सर्व्हिसेस आणि आक्रमक खेळासमोर भारतीय जोडी पूर्णपणे अपयशी ठरली. लियूच्या सर्व्हिसमुळे चिराग अडचणीत आले आणि चीनने ९-० अशी आघाडी घेतली. हा गेम एकतर्फी ठरला आणि भारताचा पराभव झाला.

आम्ही लय पकडू शकलो नाही 

सामन्यानंतर चिरागने प्रतिक्रिया देताना म्हणाला की, आम्ही लय पकडू शकलो नाही. काही सोपे गुण गमावले. पण त्यांचे श्रेय त्यांना जाते. सात्विकनेही चिनी जोडीच्या आत्मविश्वासपूर्ण खेळाचे कौतुक केले. या पराभवासह भारताचा जागतिक स्पर्धेतील प्रवास संपला असला तरी सात्विक चिराग जोडीने पुन्हा एकदा भारतीय बॅडमिंटनचा झेंडा उंचावला.

हेही वाचा : Duleep Trophy मध्ये ६ फलंदाज LBW..! झारखंडच्या मनीषीचा पदार्पणात रचला इतिहास! असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय खेळाडू

 

Web Title: Satwik chirag pair lose in semifinals of bwf world championships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 05:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.