There will be a big shock in the cricket world! Saudi Cricket Federation and American League come together
Saudi Cricket Federation and American League come together : सौदी अरेबियन क्रिकेट फेडरेशन आणि डलास-आधारित राष्ट्रीय क्रिकेट लीग हे एकत्र आले आहेत. या दोघांनी 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक खेळांच्या पार्श्वभूमीवर तळागाळातील क्रिकेटला अधिक मजबूत करण्यासाठी आणि खेळाडूंसाठी एक सोपा मार्ग निर्माण करण्यासाठी भागीदारी जाहीर केली आहे. लॉस एंजेलिस ऑलिंपिक खेळांपासून 128 वर्षांनी क्रिकेट या क्रीडा महासंघात परत येणार आहे.
हेही वाचा : IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
या भागीदारीमध्ये उत्तर अमेरिकेतील एनसीएल कार्यक्रमांद्वारे शालेय आणि सामुदायिक कार्यक्रम, प्रशिक्षण आणि पंच प्रमाणपत्र, तांत्रिक कौशल्याची देवाणघेवानी आणि सौदी अरेबियातील खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणार आहे. यामध्ये कॉलेजिएट क्रिकेट लीग आणि पाथ टू क्रिकेट प्रो टॅलेंट हंट यांचा समावेश करण्यात येणार आहे. याचा उद्देश पुढील पिढीमधील व्यावसायिक खेळाडू तयार करणे असणार आहे.
याबाबत बोलताना एनसीएलचे अध्यक्ष अरुण अग्रवाल म्हणाले की, “क्रिकेटसाठी सामायिक आवड आणि त्याच्या भविष्यासाठी एक दृष्टीकोन असणाऱ्या दोन देशांना जोडणारा हा पूल आहे. आम्ही तरुण खेळाडूंना आगडीत तळागाळाच्या पातळीपासून जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी खऱ्या संधी निर्माण करत आहोत.”
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज..
अलिकडच्या काही वर्षांत सौदी अरेबियामध्ये लोकांची क्रिकेटबाबतची आवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एसएसीएफकडून सांगण्यात आले आहे की, “एनसीएलसोबतच्या भागीदारीमुळे विकास कार्यक्रमांना गती मिळेल ज्यामुळे उदयोन्मुख प्रतिभांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होईल.
9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 ला सुरवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत 10 सप्टेंबरला यूएइविरुध्द पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेची सुरवात करणार आहे. तसेच 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल. परंतु आशिया कपपूर्वीच भारतात पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. अलिकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या हल्ल्याचा परिणाम सर्वच क्षेत्रात झालेला दिसून येत आहे. यामुळे आता सोशल मीडियावर चाहते चांगले आक्रमक झालेले दिसून येत आहे.