ICC Cricket World Cup Qualifier Match: Fireworks of sixes, fours! Scottish George Munsey smashes; 15-year-old record destroyed..
ICC Cricket World Cup Qualifier Match : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप पात्रता फेरी सामने सुरू आहेत. स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड् यांच्यातील सामना नुकताच खेळवण्यात आला आहे. या सामन्यात स्कॉटलंड संघाने स्कॉटिश सलामीवीर जॉर्ज मुन्से याने १९१ धावांच्या जोरवार ३६९ धावांचा डोंगर उभा केला होता. तरी देखील नेदरलँड् संघाने ही लक्ष्यपूर्ण करून विजय मिळवला. या सामन्यात षटकार चौकारांची बरसात झाल्याचे पाहायला मिळाले. स्कॉटलंडमधी डंडी येथील फोर्टहिलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना स्कॉटलंडच्या संघाने ३६९ धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात जॉर्ज मुन्सेने १५ वर्ष पूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
हेही वाचा : बाईईईई काय हा प्रकार… इकडे जाऊ की तिकडे! खेळाडू गोंधळला अन् गमावली विकेट
या सामन्यात स्कॉटिश सलामीवीर जॉर्ज मुन्से याने १९१ धावांची धमाकेदार खेळी केली. स्कॉटलंडचा सलामीवीर जॉर्ज मुन्से याने १४ चौकार आणि ११ षटकाराच्या मदतीने या सामन्यात १५० चेंडूत १९१ धावा कुटल्या. द्विशतक साजरे करण्याची सुवर्ण संधी त्याच्याकडे होती. पण १० चेंडू शिल्लक असताना तो फसला. द्विशतक तर हुकलंच अन् डांवाचा डोंगर उभारून देखील संघाच्या पदरी पराभव आला.
वनडे सामन्यात जॉर्ज मुन्सेचे द्विशतक अवघ्या ९ धावांनी हुकले. या खेळीसह मुन्सेने खास विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधील असोसिएट संघाकडून (आयसीसी पूर्णवेळ सदस्य नसणारा संघ) सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झाला आहे. त्याने १५ वर्षांपासून अबाधित असलेला पॉल स्टर्लिंगचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. आयरिश फलंदाजाने २०१० मध्ये कॅनडा विरुद्ध १७७ धावांची खेळी केली होती. आता स्कॉटलंडच्या मुन्सेनं १९१ धावांसह या यादीत टॉपला पोहचला आहे.
हेही वाचा : ICC च्या या महत्वाच्या नियमात होणार बदल! आता बाउंड्रीवर कॅच बेकायदेशीर मानले जाणार, वाचा सविस्तर
कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाने २८२ धावांचा स्कोअर उभा केला आहे. साऊथ आफ्रिकेचे तिसऱ्या दिवशीच्या अखेर २१३ रन्स झालेले आहेत. त्यांना विजयासाठी ६९ धावांची गरज आहे. टेम्बा बावुमा(६५) आणि एडेन मार्कराम(१०२) ही जोडी नाबाद आहे. लॉर्ड्सच्या मैदानाचा इतिहास बघता लक्षात येते की, २८० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना फक्त दोन वेळा विजय मिळवता आला आहे. इंग्लंडच्या संघाने शेवटचा हा पराक्रम २००४ मध्ये रचला होता. त्याच वेळी, १९८४ मध्ये, वेस्ट इंडिजने या मैदानावर ३४२ धावा करून इतिहास नोंदवला होता. हा दोन्ही संघांसाठी ऐतिहासिक विजय ठरला होता.