फोटो सौजन्य - X
मेजर क्रिकेट लीग कालपासुन म्हणजेच 13 जूनपासुन सुरु झाले आहे, यामध्ये पहिला सामना हा सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम या दोन संघामध्ये खेळवण्यात आला होता. या पहिल्याच सामन्यात फिन अॅलन याने एमसीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकाॅर्ड नावावर केला होता. पहिल्या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स या संघाने विजय मिळवला आहे. आज या स्पर्धेचा दुसरा सामना पार पडला हा सामना एमआय न्यू यॉर्क विरुद्ध टेक्सास सुपर किंग्ज या दोन संघामध्ये खेळवण्यात आला.
या सामन्यात टेक्सास सुपर किंग्जने एमआय न्यू यॉर्कचा ३ धावांनी पराभव झाला. टेक्सास सुपर किंग्जचे कर्णधारपद हे फाफ डूप्लेसीकडे सोपवण्यात तर एमआय न्यूयाॅर्कची कमान ही निकोलस पुरन यांच्याकडे आहे. या सामन्यात फाफ डूप्लेसी याने घेतलेला कॅचचा व्हिडीओ हा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने हवेत उडून हा कॅच घेतला आहे. याच सामन्यामधील आता आणखी एक मजेशीर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत.
ICC च्या या महत्वाच्या नियमात होणार बदल! आता बाउंड्रीवर कॅच बेकायदेशीर मानले जाणार, वाचा सविस्तर
एमआय न्यू यॉर्क विरुद्ध टेक्सास सुपर किंग्ज यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात ट्रेंट बोल्ट हा धावबाद झाला. आता तो ज्याप्रकारे धावबाद झाला आहे त्या मजेशीर घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तजिंदर ढिल्लन आणि ट्रेंट बोल्ट हे फलंदाजी करत होते. तजिंदर ढिल्लन यावेळी चेंडू खेळला आणि त्यानंतर दुसऱ्या टोकावरुन ट्रेंट बोल्ट धावला. यावेळी धावुन जेव्हा तो दुसऱ्या टोकावर गेला तेव्हा यावेळी त्याची बॅट हातातुन सटकली आणि त्यानंतर तो गोंधळला. या घटनेचा मजेशीर व्हिडीओ हा सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
This is gold 😂
via @MLCricket pic.twitter.com/RCI5AHVY1j
— That’s So Village (@ThatsSoVillage) June 14, 2025
मेजर क्रिकेट लीगमध्ये 34 सामने खेळवले जाणार आहेत, या स्पर्धेमध्ये 6 संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये दिग्गज खेळाडू देखील सामील झाले आहेत. याचदरम्यान भारताचा संघ हा इंग्लडविरुद्ध मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद हे आता शुभमन गिल सांभाळणार आहे. तर भारतीय संघाचे उपकर्णधारपद हे रिषभ पंतकडे सोपवण्यात आले आहे.