Pujara Retirement: 'He should have been kept in the team...', Shashi Tharoor's emotional post on Cheteshwar Pujara's retirement
Cheteshwar Pujara Retirement : भारतीय संघाचा भरवशाचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पूजाराने काल म्हणजे रविवार, २४ ऑगस्ट रोजी क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली. यानंतर, त्याच्यावर भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच काही प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. अशातच प्रसिद्ध काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील पुजाराच्या निवृत्तीवर भाष्य केले. चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीच्या घोषणेवर शशी थरूर अजिबात खूश असल्याचे दिसत नाहीत. या दरम्यान त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर टीका केली. त्यांच्या मते पुजाराला उत्कृष्ट कसोटी कारकिर्दीमुळे सन्मानजनक निरोप मिळायला हवा होता.
पुजारच्या निवृत्तीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे आय, व्यवस्थापनाने पुजाराला संघातून वगळण्यापूर्वी काही संधी अजून द्यायला पाहिजे होत्या. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले की, “चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीबद्दल मला खूप खेद वाटत आहे. जरी त्याला अलीकडेच भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर आणि त्याच्याकडे सिद्ध करण्यासाठी काही एक शिल्लक नसले तरी, भारतासाठी त्याच्या शानदार कसोटी कारकिर्दीसाठी त्याला संघात थोडा जास्त काळ राहण्याची संधी द्यायला हवी होती आणि तो सन्माननीय निरोपाला पात्र होता.”
पुढे, शशी थरूर यांनी लिहिले की, “जेव्हा त्याला (चेतेश्वर पुजाराला) संघातून वगळले तेव्हा तो नैसर्गिक धैर्याने देशांतर्गत मैदानावर परतला आणि त्याने अनेक प्रभावी धावा देखील केल्या, परंतु निवडकर्त्यांनी त्याच्यापासून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला संघातून वगळण्याच्या निर्णयासाठी कोणाला देखील दोषी ठरवता येणार नाही. मी त्याच्या पत्नीचे ‘डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ हे पुस्तक वाचत असताना विचार करत होतो की पुजाराकडे जे आहे ते साध्य करण्यासाठी किती करावे लागेल.”
हेही वाचा : Asia Cup 2025 पूर्वी संजू सॅमसनने दाखवला आपला जबरदस्त फॉर्म! 14 चौकार, 7 षटकार मारत झळकावले शानदार शतक
I can’t help feeling a pang of regret at the retirement of @cheteshwar1. Even if it was inevitable after his recent string of exclusions from the Indian team, and even if he has nothing left to prove, he deserved a little longer in the saddle and a dignified farewell worthy of… pic.twitter.com/sOwotYcjH8
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) August 24, 2025
चेतेश्वर पुजाराने ऑक्टोबर २०१० मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये पदार्पण केले. त्याने १०३ कसोटी सामन्यांच्या १७६ डावांमध्ये ४३.६० च्या सरासरीने ७,१९५ धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान त्याने १९ शतके आणि ३५ अर्धशतके लागावली आहेत. पुजाराने भारतासाठी पाच एकदिवसीय सामने देखील खेळेल आहेत. त्यामध्ये त्याने ५१ धावा केल्या आहेत.