Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमच्या घरी चोरी! सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला खळबळजनक खुलासा

भारताची अनुभवी स्टार बॉक्सर आणि सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमच्या फरिदाबाद येथील घरी चोरी झाली आहे. याबाबत आता स्थानिक पोलिस तपास करत असून घराचे सिसिटीव्ही फुटेज तपसण्यात येत आहेत,.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 28, 2025 | 04:32 PM
Theft at world champion Mary Kom's house! CCTV footage reveals shocking details

Theft at world champion Mary Kom's house! CCTV footage reveals shocking details

Follow Us
Close
Follow Us:

Theft at Mary Kom’s house :  भारताची स्टार बॉक्सर आणि सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या मेरी कोमच्या फरिदाबाद येथील घरी चोरी झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. चोरीच्या बातमीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने  स्थानिकांना धक्का बसला असून माहिती मिळताच, पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल जाहले आहेत. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.  पोलिसांकडून मेरी कोमच्या घराची सुरक्षा व्यवस्था आणि संभाव्य चोरांबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

घटना सीसीटीव्हीमध्ये झाली कैद

संपूर्ण चोरीचा उलगडा करण्यासाठी आणि या चोरीला जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून प्रकरणाचा तपास देखील करण्यात येत आहे. मेरी कोमच्या घरी झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता  समोर आले आहे, ज्यामध्ये ६-७ लोक घरातून वस्तू चोरताना स्पष्टपणे दिसून येत आहेत. पोलिसांकडून लवकरच प्रकरण सोडवण्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा : IND vs PAK : भारत-पाकिस्तान अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय? आशिया कपची ट्रॉफी कोणाच्या पारड्यात पडेल? वाचा सविस्तर

मेरी कोम दोन आठवड्यांपासून दूर आहे

मेरी कोम गेल्या तीन वर्षांपासून फरिदाबादच्या सेक्टर ४६ मधील घर क्रमांक ३०० मध्ये वास्तव्य करत आहे. शेजाऱ्यांच्या मते, ती गेल्या दोन आठवड्यांपासून घराबाहेर दूर आहे. ती एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मेघालयला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. २४ तारखेला सकाळी ही चोरीची घटना घडली आहे. २६ तारखेला सीसीटीव्ही फुटेज तपसल्यानंतर शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सहा ते सात जण मेरी कोमच्या घरात एक घुसून वस्तू चोरून पळून जाताना स्पष्ट दिसू आले आहेत. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना आणि मेरी कोमला याबाबत माहिती दिली.

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक विभागाचे पथक आणि स्थानिक पोलिस उपस्थित होते आणि त्यांनी या प्रकरणाचा आता तपास सुरू केला आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा करण्यात येईल  आणि लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा : IND vs PAK Final match : आता थोडीशी चूकही पडेल महागात..; भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

तथापि, घरातून कोणत्या वस्तू चोरीला गेल्या याबाबत अद्याप कळू शकलेले नाही.  पोलिस याबाबत तपास करत आहेत आणि मेरी कोमच्या परत येण्याची वाट पाहत आहेत. तिच्या परतल्यानंतरच घरातून कोणत्या वस्तू चोरीला गेल्या याबाबत कळू शकेल.

Web Title: Shocking revelations from cctv footage of theft at world champion mary koms house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 04:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.