पावसामुळे सामना रद्द होऊ शकतो(फोटो-सोशल मीडिया)
India vs Pakistan, Asia Cup 2025 Final : आज आशिया कप २०२५ ( Asia Cup 2025 )चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. आज रविवार २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या सामन्याची क्रिकेटप्रेमींना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. आशिया कपच्या ४१ वर्षाच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर असणार आहेत. आशिया कप २०२५ च्या स्पर्धेत भारतीय संघ शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत पोहचला आहे. यास्पर्धेत भारताने पाकिस्तानचा दोन वेळा पराभव केला आहे. तर पाकिस्तानने भारतवगळता श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत करत अनितं फेरी गाठली आहे. अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. अशातच आता एक प्रश्न पुढे आला आहे तो म्हणजे सामन्यादरम्यान जर वरुण राजाने हजेरी लावली आणि सामना रद्द करावा लागला तर आशिया कप २०२५ ची ट्रॉफी कुणाला मिळणार? चल तर याबाबत आपण जाणून घेऊया.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही सामन्यात पावसाने व्यत्यय आलेला नाही. सर्व सामने व्यवस्थित पार पडले आहेत. पण काही क्रिकेट प्रेमींना असा प्रश्न पडला आहे की, अंतिम सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द झाला तर या स्पर्धेचे विजेतपद कुणाला मिळेल? या प्रश्नाचे उतर आहे की, आशियाई क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार, जर हवामान किंवा इतर अडथळ्यांमुळे सामना रद्द झाला, तर ट्रॉफी दोन्ही अंतिम स्पर्धकांमध्ये वाटण्यात येईल.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचा सरल अर्थ असा की जर सामन्यात पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे व्यत्यय निर्माण झाला तर राखीव दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी विजेता संघ निश्चित करण्यात येईल.
साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, हुसेन तलत, सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.