
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल २३ नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची चर्चा शहरात सुरू आहे. हळदी समारंभाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन फिरत आहेत. आता, संगीत समारंभातील काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात पलाश आणि स्मृती स्टेजवर नाचताना दिसत आहेत. या दोघांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहे.
पलाश आणि स्मृतीने केला जबरदस्त डान्स
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल एकत्र नाचताना दिसले आहेत. व्हिडिओची सुरुवात स्मृतीने माळ आणून पलाशच्या गळ्यात घातली आहे. त्यानंतर दोघे एकत्र जबरदस्त डान्स करताना दिसले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते प्रेमाने प्रतिसाद देत कंमेंट करताना दिसले आहेत.
जुन्या गाण्यावर थिरकली आर्ची; फक्त 2 तास रिहर्सल, रिंकू राजगुरूचा डान्स Video Viral
त्यांनी स्टेजवर एकमेकांसाठी गायले गाणे
स्मृती आणि पलाश यांनी स्टेजवर एकमेकांसाठी रोमँटिक गाणी देखील गायली. स्मृतीने पलाशला प्रपोज केले. स्मृतीने तिच्या पालकांसोबत डान्स देखील केला. पलाशची बहीण पलकनेही तिच्या भावा आणि वहिनीसाठी सादरीकरण केले. स्मृती आणि पलाशच्या लग्नात संपूर्ण कुटुंब आनंदाने नाचताना दिसले. स्मृती आणि पलाश या कार्यक्रमात खूप आनंदी दिसले.
महिला क्रिकेट संघाने स्मृतीसाठी केला डान्स
संगीत समारंभातील या व्हिडिओमध्ये संपूर्ण भारतीय महिला क्रिकेट संघ त्यांची मैत्रीण आणि खेळाडू स्मृती मानधना हिच्यासाठी एक खास गट नृत्य सादर करताना दिसत आहे. सर्वजण “तेरा यार हूं मैं” या गाण्यावर नाचताना दिसले आहेत. हा एक अतिशय गोड व्हिडिओ आहे. ज्या व्हिडीओमध्ये त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम स्पष्ट दिसत आहे.
लग्नाला अनेक सेलिब्रिटी राहणार उपस्थित
स्मृती क्रिकेट जगतातील एक स्टार आहे, तर पलाश मुच्छल एक संगीतकार आणि निर्माता आहे. हे दोघे उद्या, रविवार, २३ नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहेत. या हाय-प्रोफाइल लग्नाला चित्रपट आणि क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. लग्नापूर्वी पलाशने डीवाय पाटील स्टेडियममध्ये रोमँटिक पद्धतीने स्मृतीला प्रपोज केले. या जोडप्याचा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला देखील चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.