Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND w vs AUS W, 3rd T20I :  भारताला ऑस्ट्रेलियासमोर 177 धावांचे लक्ष्य! मानधना आणि रॉड्रिग्ज जोडीची तूफान फटकेबाजी 

भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. अॅडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर १७७ धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 21, 2026 | 04:49 PM
IND w vs AUS W, 3rd T20I: India set a target of 177 runs against Australia! Stormy batting from Mandhana and Rodriguez

IND w vs AUS W, 3rd T20I: India set a target of 177 runs against Australia! Stormy batting from Mandhana and Rodriguez

Follow Us
Close
Follow Us:

Australia Women vs India Women, 3rd T20I : भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. अॅडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ६ विकेट गमावून स्मृति मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकांच्या जोरावर १७६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी १७७ धावा कराव्या लागणार आहेत.

हेही वाचा : IND VS ZIM : ‘आमच्यावर नाही, भारतावरच दबाव…’ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेला धूळ चारणाऱ्या झिम्बाब्वेने सूर्याआर्मीविरुद्ध फोडली डरकाळी

भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. १९ धावांवर असताना, शेफाली वर्माच्या रूपात संघाला पहिला झटका बसला. शेफाली ७ धावांवर माघारी गेला. त्यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ चेंडूत १२१ धावांची भागीदारी रचली.

मानधनाची शानदार खेळी

या खेळीदरम्यान मानधनाने तिचे अर्धशतक झळकवले. ती शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना ती ८२ धावांवर बाद झाली. तिच्या ५५ ​​चेंडूंच्या खेळीत मानधनाने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. जेमिमा रॉड्रिग्ज ४६ चेंडूत ५९ धावांवर माघारी गेली.  यामध्ये ४ चौकार लगावले.  यष्टिरक्षक रिचा घोषने ७ चेंडूत १८ धावांची जलद खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर २ धावांवर नाबाद राहिली. भारतीय संघाने ६ विकेट्सवर १७६ धावा उभ्या केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅनाबेल सदरलँडने २ बळी घेतले, तर किम गार्थ आणि सोफी मोएलिक्सने प्रत्येकी १ बळी टिपला.

एलिस पेरीने रचला इतिहास

ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू एलिस पेरीसाठी हा सामना विशेष आहे. एलिस पेरीचा हा ३५० वा सामना ठरला असून ती ऑस्ट्रेलियन महिला संघासाठी ३५० सामने खेळणारी पहिलीच खेळाडू बनली आहे. ही कामगिरी करणारी ती जगातील तिसरी महिला क्रिकेटपटू देखील ठरली आहे. पेरीपूर्वी फक्त दोन खेळाडूंनी ही कामगिरी बजावली आहे.  भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स यांनी ही कामगिरी केली आहे. एलिस पेरीनंतर, सध्याची एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार एलिसा हीलीने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक सामने खेळलेले आहेत. हीलीने एकूण २९५ सामने खेळलेले आहेत

हेही वाचा : IND w vs AUS W, T-20 Series : एलिस पेरीने इतिहास घडवला! ऑस्ट्रेलियासाठी ‘हा’ भीम पराक्रम करणारी ठरली ती पहिली महिला खेळाडू

Web Title: Ind w vs aus w 3rd t20i india set a target of 177 runs against australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • IND w vs AUS W
  • Jemimah Rodrigues
  • Smriti Mandhana
  • T-20 Series

संबंधित बातम्या

IND w vs AUS W, T-20 Series : एलिस पेरीने इतिहास घडवला! ऑस्ट्रेलियासाठी ‘हा’ भीम पराक्रम करणारी ठरली पहिली महिला खेळाडू
1

IND w vs AUS W, T-20 Series : एलिस पेरीने इतिहास घडवला! ऑस्ट्रेलियासाठी ‘हा’ भीम पराक्रम करणारी ठरली पहिली महिला खेळाडू

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11
2

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

IND W vs AUS W : मालिकेत बरोबरी…तिसऱ्या सामन्यावर असेल भारतीय संघाची नजर! कोणाच्या हाती लागणार सिरीज
3

IND W vs AUS W : मालिकेत बरोबरी…तिसऱ्या सामन्यावर असेल भारतीय संघाची नजर! कोणाच्या हाती लागणार सिरीज

IND w vs AUS W, T-20 Series : ऑस्ट्रेलियाचा भारतावर 19 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत 
4

IND w vs AUS W, T-20 Series : ऑस्ट्रेलियाचा भारतावर 19 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.