
Smriti Mandhana: "In that situation, I remembered God..." Smriti Mandhana came forward for the first time after postponing her wedding...; Watch VIDEO
Smriti Maandhana’s first post after postponing her wedding : भारतीय संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी स्मृती मानधना आणि तिचा मंगेतर पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. परंतु, तिच्या वडिलांची अचानक तब्बेत बिघडल्याने ते पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर तिचा मंगेतर पलाश मुच्छलबाबत अनेक चॅट व्हायरल होऊ लागल्या. ज्यामुळे त्याने स्मृतीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे आता या दोघांचे लासगण कधी होणार अशी देखील चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, आता स्मृती मानधना लग्न पुढे ढकल्यानंतर १२ दिवसांनी समोर आली आहे. मानधना हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, परंतु, पोस्टमध्ये मानधना हिने लग्नाबद्दल कोणतेही माहिती दिली नाही. परंतु व्हिडिओमध्ये मानधना हिने वर्ल्ड कप फायनलमधील तिचे अनुभव शेअर करत असल्याचे दिसत आहे.
स्मृती मानधना हिने ५ डिसेंबर रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ही पोस्ट नियमित पोस्ट नसली तरी, ती तिच्या ब्रँड एंडोर्समेंटसाठीचा प्रायोजित एक व्हिडिओ होता. त्यामध्ये तिने २०२५ चा विश्वचषक जिंकण्याचे तिचे अनुभव शेअर केले आहेत. मंधना म्हणाली की गेल्या १२ वर्षांपासून विश्वचषक गमावल्यानंतर, ती कधी जिंकेल याचा विचार सतत करत होती आणि जेव्हा २ नोव्हेंबर रोजी टीम इंडियाने ट्रॉफी जिंकली तेव्हा तिला पुन्हा बाळाचा आनंद जाणवला. असे ती म्हणाली आहे.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची आठवण करून देताना, मानधना म्हणाली की, तिला फलंदाजी करताना जास्त विचार करण्याची गरज नव्हती कारण ती संघाच्या गरजेनुसार खेळत होती. तथापि, क्षेत्ररक्षण करताना, मानधना देवाचे स्मरण करत होती. ती म्हणाली की, “क्षेत्ररक्षण करताना, मला सर्व देव आठवत होते. संपूर्ण ३०० चेंडूंसाठी, मी देवाला प्रार्थना करत होते, फक्त मला विकेट मिळावी.”
स्मृती मानधनाची पोस्ट तिचे लग्न पुढे ढकलण्यात आल्यानंतर १० दिवस उलटून गेल्यानंतर आली आहे. स्मृती आणि तिचा मंगेतर पलाश मुच्छल यांचे गेल्या महिन्यात २३ नोव्हेंबर रोजी लग्न पार पडणार होते. लग्न सोहळा सांगली येथील मंधनाच्या घरी होणार होता. परंतु ते अचानक स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावल्याचे म्हटले आहे. त्यानंतर लग्नाबाबत कोणतीही माहिती जाहीर केली गेली नाही. त्यामुळे चाहत्यांना तिच्या लग्नाच्या तारखेची घोषणा कधी होईल याची उत्सुकता लागून राहिली आहे.