Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यूएस ओपनमध्ये भारताच्या खेळाडूंची दमदार कामगिरी; तिसऱ्या राऊंडमध्ये पोहचले रोहण बोपण्णा आणि भांबरी यांची जोडी

न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेत भारताची युकी भांबरी आणि फ्रान्सचा अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीनेही तिसरी फेरी गाठली. यासह कार्लोस अल्काराझ आणि नोव्हाक जोकोविच पुरुष एकेरीच्या बाहेर झाले.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 31, 2024 | 03:10 PM
Strong Performance by Indian Players in US Open and Rohan Bopanna and Bhambri Reach Third Round with Their Partners

Strong Performance by Indian Players in US Open and Rohan Bopanna and Bhambri Reach Third Round with Their Partners

Follow Us
Close
Follow Us:

न्यूयॉर्क : भारताचा युकी भांब्री आणि फ्रान्सचा अल्बानो ऑलिवेट्टी यांनी शानदार पुनरागमन करताना पहिला सेट गमावून ऑस्टिन क्रॅजिसेक आणि जीन-ज्युलियन रॉजर यांचा पराभव करीत यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीची तिसरी फेरी गाठली. भांबरी आणि ऑलिवेट्टी या जोडीने अमेरिकेच्या क्राजिसेक आणि नेदरलँडच्या जीन-ज्युलियन रॉजर या १५व्या मानांकित जोडीचा ४-६, ६-३, ७-५ असा पराभव केला. भांबरीने ग्रँड स्लॅम स्पर्धेची तिसरी फेरी गाठण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे.  याआधी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही तो असाच टप्पा गाठला होता.

रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीनेही केली कमाल
रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या द्वितीय मानांकित जोडीनेही स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बायना आणि अर्जेंटिनाच्या फेडेरिको कोरिया यांच्यावर 6-2, 6-4 असा विजय मिळवत तिसरी फेरी गाठली. दुसरा भारतीय खेळाडू, एन श्रीराम बालाजी आणि त्याचा अर्जेंटिनाचा साथीदार गुइडो आंद्रेओझी दुसऱ्या फेरीत न्यूझीलंडचा मायकेल व्हीनस आणि ग्रेट ब्रिटनचा नील स्कुप्स्की यांच्याकडून पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला. भारत आणि अर्जेंटिनाच्या जोडीला दुसऱ्या फेरीच्या सामन्यात 6-7 (4), 4-6 असा पराभव पत्करावा लागला. व्हीनस आणि स्कुप्स्की यांनी सात ब्रेक पॉइंट्सचा सामना केला आणि त्यापैकी एकाचे रुपांतर केले. सव्र्हिस ब्रेकच्या एकमेव संधीचे रुपांतर बालाजी आणि अँड्रॉझी यांना करता आले नाही.
कार्लोस अल्काराझ आणि नोव्हाक जोकोविचही बाद 
पुरुष एकेरीत स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराज बाहेर पडल्यानंतर गतविजेता नोव्हाक जोकोविचही यूएस ओपनमधून बाहेर झाला आहे. त्याचा ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सी पोपिरिनने ६-४, ६-४, २-६, ६-४ असा पराभव केला. सामन्यानंतर जोकोविच म्हणाला, ‘खरं सांगायचं तर ही माझी आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी आहे. हा सामना माझ्यासाठी दुःस्वप्नसारखा होता. मी माझ्या सर्वोत्तम खेळाच्या जवळपासही खेळू शकलो नाही.

Web Title: Strong performance by indian players in us open and rohan bopanna and bhambri reach third round with their partners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 03:10 PM

Topics:  

  • Rohan Bopanna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.