Sunrisers Hyderabad's big scare for IPL 2026! A big responsibility has been placed on the shoulders of 'this' former bowler..
IPL 2026 : आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. आता ही कामगिरी विसरून सनरायझर्स हैदराबाद आयपीएल २०२६ च्या तयारीला लागला आहे. यासाठी सनरायझर्स हैदराबादकडून भारताचा माजी वेगवान गोलंदाज वरुण आरोनकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सनरायझर्स हैदराबादने वरुण आरोनची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आरोन न्यूझीलंडचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज जेम्स फ्रँकलिनची जागा घेणार आहे.
सनरायझर्स हैदराबादकडून त्यांच्या एक्स अकाउंटवर ट्विट करून याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, वरुण आरोन या संघाचा नवा सदस्य असेल. त्यांनी म्हटले की “आमच्या कोचिंग स्टाफचा एक उत्तम सदस्य आहे! आमचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून वरुण आरोनचे स्वागत आहे.”
वरुण आरोनने २०११ ते २०१५ दरम्यान भारताकडून नऊ कसोटी आणि नऊ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. तसेच आरोनने या वर्षी ५ जानेवारी रोजी जयपूरमध्ये गोवा विरुद्ध झारखंडसाठी खेळवण्यात आलेला विजय हजारे ट्रॉफी सामन्यात त्याने आपला शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. झारखंड या ५० षटकांच्या स्थानिक स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचू शकला नव्हता, त्यामुळे त्याने नंतर निवृत्तीची घोषणा केली होती. गेल्या वर्षी चेन्नई येथील एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये वरुणने ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅकग्रा यांच्यासोबत काही काळ प्रशिक्षक म्हणून देखील काम केले आहे .
आरोनने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत असे. त्याच्या या क्षमतेमुळे त्याने तरुण वेगवान गोलंदाज म्हणून त्याने आपली छाप पाडली होती. वारंवार दुखापतींमुळे आरोनची कारकीर्द जास्त काळ टिकू शकली नाही. निवृत्तीनंतर त्याने टेलिव्हिजनवर क्रिकेट तज्ज्ञ म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.
सनरायझर्स हैदराबादची आयपीएल २०२५ ची कामगिरी खूप प्रमाणात निराशाजनक राहिली होती. या संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात २८६ धावांची धमाकेदार सुरुवात केली असली तरी, त्यांना संपूर्ण हंगामात आपल्या कामगिरी सातत्य राखता आले नाही.
हेही वाचा : IND Vs ENG : आर्चरमुळे भारत अडचणीत; पंत मागोमाग सुंदरचा अप्रतिम झेल टिपत दाखवला बाहेरचा रस्ता, पहा व्हिडीओ
२०२४ मध्ये उत्तम लयीत असलेल्या ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माची सलामीची जोडी आयपीएल २०२५ मध्ये मात्र पूर्ण अपयशी ठरले. जेव्हा जेव्हा संघाला त्यांच्याकडून मजबूत कामगिरीची गरज होती. तेव्हा ते दबावाखाली बाद झाले. याशिवाय, इशान किशन, हेनरिक क्लासेन आणि नितीश रेड्डी सारखे फलंदाज देखील मधल्या फळीत चांगली कामगरी करू शकले नाहीत.