अटक करण्यात आलेले आरोपी(फोटो-सोशल मीडिया)
कानपूर : भारतात क्रिकेट हा खेळ प्रचंड लोकप्रिय आहे. या खेळातील खेळाडू नेहमी चर्चेत असतात, त्यांच्या आलिशान राहण्या-जगण्याने, मात्र क्रिकेटशिवाय देशातील अनेक खेळ त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचे दिसून येत आहेत. खेळांची स्थिती वाईट असून खेळाडूंची देखील आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे. अशातच कानपूरमधून एक बातमी समोर आली आहे. जी सर्वांना विचार करायला भाग पाडणारी आहे. येथे २ राष्ट्रीय खेळाडूंना दरोड्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही आरोपी कानपूर विद्यापीठातून डिप्लोमा करत असल्याचे समजते.
पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा आरोपींकडून काबुल करण्यात आले कि, आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे. फ्लॅटचे भाडे आणि वीज बिल भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात तेव्हा त्यांना दरोडा टाकण्यासारखे गुन्हे करावे लागतात. अटक करण्यात आलेला आरोपी उत्कर्ष हा राष्ट्रीय स्तरावरील हॉकी खेळाडू आहे आणि श्रेयांस सिंग हा राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल खेळाडू असल्याची माहिती समोर आली. या दोघांनी देखील त्यांचा मित्र दिनेश यादव आणि आणखी एका साथीदारासह दरोडा टाकला आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : आर्चरमुळे भारत अडचणीत; पंत मागोमाग सुंदरचा अप्रतिम झेल टिपत दाखवला बाहेरचा रस्ता, पहा व्हिडीओ
याबाबत अधिक माहिती अशी कि, संकेत त्रिपाठी नावाचा एक व्यापारी ११ जुलै रोजी दिल्लीहून रावतपूर रेल्वे स्थानकावरून सामान घेऊन बाहेर जात होता. येथे तो वाहनाची वाट पाहत होता. यावेळी तीन जण वॅगनआरमध्ये बसलेले दिसून आले. एक बाहेर उभा होता. त्या लोकांकडून संकेतला विचारण्यात आले कि तुला कुठे जायचे आहे. मग, त्याने शिवलीचे नाव सांगितले. या लोकांकडून त्या व्यावसायिकाला असे देखील सान्गण्यात आले कि, आम्हीही शिवलीलाच जाणार आहोत. कसा तरी या लोकांनी त्या व्यावसायिकाला आपल्या विश्वासात घेऊन त्याला गाडीत बसवले.
वॅगनआरमध्ये, चार दरोडेखोरांनी व्यापारी संकेत त्रिपाठीला स्टेशनवरून बसवून घेतले. वाटेत गाडी कल्याणपूरला तःबवण्यात आली. जिथे ती जागा पूर्णपणे निर्जन होती. याचा फायदा घेऊन या लोकांनी व्यावसायिकाला मारहाण करायला सुरवात केली आणि त्याचे पैसे आणि सर्व सामान हिसकावून घेतले. व्यावसायिकाला गाडीतून खाली ढकलून दिल्यावर दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले. आरोपींनी UPI द्वारे व्यावसायिकाच्या मोबाईलवरून त्यांच्या खात्यात ₹१५००० ट्रान्सफर करूंन घेतले.
पीडित व्यावसायिकाकडून रावतपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी पाळत ठेवणे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करण्यास सुरवात केली. रविवारी पोलिसांकडून चारही आरोपींना अटक करण्यात आली. तपासात असे दिसून आले की, दरोड्यात सहभागी असणाऱ्या दिनेश यादवने यापूर्वी देखील अनेक गुन्हे केलेले आहेत. त्यानेच या संपूर्ण दरोड्याची योजना आखली होती. आरोपींनी पोलिसांसमोर कबूल केले की त्यांच्याकडे फ्लॅटचे भाडे आणि वीज बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी हे कृत्य केले आहे. एडीसीपी कपिल देव सिंह म्हणाले की, आरोपींना पकडण्यात आले असून पुढील कारवाई केली करण्यात येत आहे.