Suresh Raina will shine on the big screen; He will score fours and sixes in his acting! He will make his debut in a Tamil film; Watch Video
Suresh Raina to star in Tamil film : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सुरेश रैना आता चर्चेत आला आहे. सुरेश रैना आता चित्रपटापट सृष्टीत पाऊल ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या शानदार फलंदाजीने लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रैनाला तमिळ चित्रपटाची भुरळ पडली आहे. तो आता तमिळ चित्रपट उद्योगात म्हणजेच कॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास रेडी झाला आहे.
ड्रीम नाईट स्टोरीजच्या बॅनरखाली बनवण्यात येणाऱ्या चित्रपटातून रैना तमिळ चित्रपट उद्योगात अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. प्रॉडक्शन हाऊसकडून एक धमाकेदार व्हिडिओ टीझर रिलीज करून याला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. या व्हिडिओमध्ये, सुरेश रैना क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश करताना दिसत आहे. जिथे चाहते त्याचे उत्साहाने स्वागत करता असल्याचे दिसत आहेत.
टीझर शेअर करताना, प्रॉडक्शन टीमने कॅप्शन लिहिले आहे की, “स्वागत आहे चिन्ना थला सुरेश रैना डीकेएस प्रॉडक्शन नंबर १ मध्ये.” रैनाला त्याचे चाहते प्रेमाने ‘चिन्ना थला’ म्हणून संबोधतात आणि चेन्नई सुपर किंग्जमधील त्याच्या योगदानामुळे, तमिळनाडूमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत.
या चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर करण्यात आलेले नसले तरी, टीझर पाहून असा अंदाज लावण्यात येत आहे की, हा चित्रपट क्रिकेटवर बेतलेला असावा. हा चित्रपट लोगान दिग्दर्शित करत असून डीकेएस बॅनरखाली श्रवण कुमार त्याची निर्मिती करत आहेत.
सुरेश रैनाच्या अभिनय क्षेत्रात प्रवेशाची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकांकडून रैनाचे कॉलिवुडमध्ये स्वागत करण्यात येत आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, “नमस्कार रैना भाई, कॉलिवुडमध्ये आपले स्वागत आहे.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, “तो आता कॉलिवुडवर देखील राज्य करेल.” पुढे लिहिले, “खरोखर २०२५ हे आश्चर्यांनी भरलेले वर्ष आहे.”
हेही वाचा : BCCI च्या मोठ्या निर्णयानंतर, नितीश राणा नवीन लीगमध्ये खेळताना दिसणार, लिलावात यू-टर्नमुळे लागली बोली
भारताकडून ४२७ धावांवर दुसरा डाव घोषित करण्यात आला. त्यानंतर, चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ३ विकेट गमावून ७२ धावा केल्या आहेत. यादरम्यान जॅक क्रॉली ०, बेन दत्ता २५ आणि जो रूट २६ धावांवर माघारी परतले. भारताकडून आकाश दीपने २ आणि मोहम्मद सिराजने चौथ्या दिवशी १ विकेट घेतली. आज ६ जुलै हा कसोटीचा शेवटचा दिवस असणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला जिंकण्यासाठी ७ बळींची गरज असून त्याच वेळी, इंग्लंडला दुसरी कसोटी जिंकण्यासाठी ५३६ धावा कराव्या लागणार आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.