दिल्ली विरुद्ध लखनौचा सामना (फोटो- ai gemini)
आज एलएसजी विरुद्ध डीसीमध्ये रंगणार सामना
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार
दोन्ही संघांमध्ये कोणते 11 खेळाडू अंतिम असणार
Tata IPL DC Vs LSG Live Updates: आज लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे. दरम्यान आज सर्वांच्या नजरा ऋषभ पंतच्या कामगिरीकडे असणार आहे. दरम्यान आज दोन्ही संघामध्ये कोणते अकरा खेळाडू खेळण्याची शक्यता आहे, ते जाणून घेऊयात.
दिल्लीच्या संघाकडून केएल राहुल ओपन करणार हे कर्णधार अक्षर पटेलने स्पष्ट केले आहे. पृथ्वी शॉ किंवा पथूम निसांक राहुल सोबत ओपन करू शकतात. मिडल ऑर्डरमध्ये अनेक चांगले खेळाडू दिल्लीकडे उपलब्ध आहेत. मिडल ऑर्डरमध्ये डेव्हिड मिलर, अक्षर पटेल, नितीश राणा, अभिषेक पोरेल हे खेळाडू असणार आहेत. गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास फिरकीमध्ये अक्षर आणि कुलदीप यादव असे पर्याय उपलब्ध आहेत.
दुसरीकडे एलएसजीच्या संघाबबत बोलायचे झाल्यास हा संघ समतोल असल्याचे पाहायला मिळत आहे. मिशेल मार्श आणि एडेन मारक्रम ही सलामीची जोडी आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. कर्णधार ऋषभ पंत देखील फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शामी हा चांगला खेळाडू एलएसजीकडे आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे.
LSG vs DC Pitch Report: लखनौच्या मैदानावर कोणाचे राहणार वर्चस्व? पावसाचे सावट, कसा रंगणार सामना
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: के.एल. राहुल, पथुम निसंका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी
एलएसजी संभाव्य टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी
लखनौच्या मैदानावर कोणाचे राहणार वर्चस्व?
लखनौच्या एकाना स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे संथ आहे. फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगले वळण मिळते आणि या मैदानावर मोठी धावसंख्या होत नाही हे या मैदानाचे वैशिष्ट्य . एकाना स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५१ धावा, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १२६ धावा आहे.
आज IPL मध्ये राडा! LSG कडून Rishabh Pant ‘या’ नंबरवर खेळणार? कोच म्हणाले, “तुम्हाला इथे बसून…”
अॅक्युवेदरनुसार, बुधवारी लखनौमध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.






