CSK vs KKR Toss Live Updates (फोटो- ians)
केकेआर विरुद्ध चेन्नईचा संघ येणार आमने सामने
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
अजिंक्य रहाणेच्या संघासाठी करो या मरो स्थिती
Tata IPL 2026 CSK vs KKR Live Updates: थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामना सुरू होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना होत आहे. केकेआरसाठी आजचा (IPL) सामना अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. कारण अद्याप त्यांना विजयाचे खाते उघडता आलेले नाही. दरम्यान आजच्या सामन्यात केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेपॉक स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध केकेआर आमनेसामने येणार आहेत. आजचा सामना केकेआरसाठी करो या मरो या स्थितीमध्ये असणार आहे. काहीही करून केकेआरला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. अद्याप केकेआरला यंदाच्या आयपीएल हंगामात विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणेची आजच्या सामन्यात कसोटी लागणार आहे.
तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने मागच्या सामन्यात दिल्ली कपिटल्सचा पराभव करून पहिला विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना देखील जिंकून गुणतालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि चेन्नईचा संघ करणार यात शंका नाही. त्यामुळे आज चेपॉकच्या मैदानावर चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
CSK ला चीतपट करण्यासाठी KKR ने आखला मास्टरप्लॅन; दोघांची Playing 11 अन्…; वाचा सविस्तर
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
एम.ए. चिदंबरम स्टेडियमची आजची खेळपट्टी थोडीशी वेगळी असल्याचे म्हंटले जात आहे. पहिल्यांदा हे पीच स्लो होते. मात्र आता लाल मातीमुळे येथे पीच थोडे फास्ट असे झाले आहे. सुरुवातीला फलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र मधले काही ओव्हर्स स्पिनर्सला फायदा होताना दिसेल. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे थोडे अवघड जाऊ शकते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. एम.ए. चिदंबरम स्टेडियमची आजची खेळपट्टी थोडीशी वेगळी असल्याचे म्हंटले जात आहे. पहिल्यांदा हे पीच स्लो होते. मात्र आता लाल मातीमुळे येथे पीच थोडे फास्ट असे झाले आहे. सुरुवातीला फलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र मधले काही ओव्हर्स स्पिनर्सला फायदा होताना दिसेल. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे थोडे अवघड जाऊ शकते.
सीएसकेची संभाव्य टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन , आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, सरफराज खान, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, अकिल हुसेन , नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुर्जनप्रीत सिंग, कार्तिक शर्मा.
CSK Vs KKR Pitch Report: ‘केकेआर’ पराभवाचा चौकार लगावणार की…; कसे असणार आजचे पीच?
केकेआरची संभाव्य टीम: अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ॲलन, कॅमेरून ग्रीन, अँगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, रमणदीप सिंग, सुनील नरीन, नदीप सैनी, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती






