PBKS Vs SRH Live Streaming (फोटो- ट्विटर)
एसआरएचने पंजाबला दिले 220 रन्सचे टार्गेट
अभिषेक शर्माने केली वादळी खेळी
प्रियांश आर्याची 57 रन्सची अर्धशतकी खेळी
Tata IPL 2026 PBKS vs SRH Live: आज न्यू चंदीगडच्या क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना पार पडला. श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र अभिषेक शर्मा आणि हेनरी क्लासेन , हेडच्या जोरदार खेळीमुळे एसआरएचने पंजाबला 220 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात पंजाब किंग्जने एसआरएचवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे पंजाब किंग्जने हा विजय प्राप्त केला आहे.
पंजाब किंग्जची फलंदाजी
220 रन्सचा आव्हान गाठण्यासाठी पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश शर्मा खेळण्यासाठी आले. त्या दोघांनी पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. पंजाबला एक चांगल्या धावसंख्येचा पाया त्यांची रचून दिला. प्रभसिमरन सिंगने अर्धशतक केले. 51 रन्सकरून तो आउट झाला. त्यानंतर प्रियांश आर्याने 57 रन्सची वादळी खेळी केली. कूपर कॉनली या सामन्यात चांगली खेळी कृ शकला नाही. तो 11 रन्स करून आउट झाला.
पंजाब किंग्जची गोलंदाजी
पंजाब किंग्जच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये एकही विकेट मिळवता आली नाही. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी गोलंदाजांना एकही विकेट मिळू दिली नाही. प्रमुख गोलंदाजांना एकही विकेट न मिळाल्यामुळे श्रेयस अय्यरने मिडियम पेसर असलेल्या शशांक सिंहला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले. त्याने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माची विकेट पटकावली आणि एसआरएचच्या डावाला ब्रेक लावला. अर्शदीप सिंगने साहिल अरोरा आणि कर्णधार इशान किशनला आउट केले. तर बार्टलेटने हेनरी क्लासेनला आउट केले. तर युझवेंद्र चहला आजच्या सामन्यात एकही विकेट मिळवता आली नाही. त्याने तीन ओव्हर्समध्ये 33 रन्स दिले.
एसआरएची फलंदाजी
ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने एसआरएचच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 100 रन्सची भागीदारी केली. ट्रेविस हेड 38 रन्स करून आउट झाला. तर अभिषेक शर्माने 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर अभिषेक शर्मा सिक्स मारण्याच्या नादात 78 रन्स करून आउट झाला. त्यानंतर हेनरी क्लासेन आणि कर्णधार इशान किशन खेळण्यासाठी मैदानात उतरले. इशान किशन 27 रन्स करून आउट झाला. तर अनिकेत वर्माने 18 रन्स केल्या. तर सलिल अरोराने 9 रन्स केल्या. हेनरी क्लासेन शेवटच्या ओव्हरमध्ये 39 रन्स करून आउट झाला. नितीश कुमार रेड्डी नॉटआउट राहिला. त्याने एकही रन केले नाही.
SRH Vs PBKS: हैदराबादने ‘कुटलं’ अन् Abhishek Sharma ने ‘धुतलं’; PBKS ला विजयासाठी 220 रन्सचे टार्गेट
एसआरएची गोलंदाजी
220 रन्सचा बचाव करण्यासाठी एसआरएचचे गोलंदाज मैदानात उतरले होते. मात्र पॉवर प्लेमध्ये त्यांना एकही विकेट मिळवता आलेली नाही. एसआरएचकडून शिवांग कुमारने प्रभावी गोलंदाजी केली. शिवांग कुमारने प्रभसिमरन सिंग, कूपर कॉनली आणि प्रियांश आर्याची विकेट पटकावल्या. तीने आपल्या स्पेलमध्ये 3 विकेट्स घेतल्या.
एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा.
पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंह, मार्को यानसन, जेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल.






