MI vs PBKS Pitch Report (फोटो - ai gemini)
मुंबई इंडियन्ससाठी आज करो या मरो स्थिती
वानखेडे स्टेडियमवर लागणार पलटणचा कस
मुंबई विरुद्ध पंजाब येणार आमनेसामने
Tata IPL 2026 MI vs PBKS Live Updates: आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (MI Vs PBKS) यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात तब्बल 12 वर्षांनी (IPL 2026) पहिला सामना जिंकणाऱ्या मुंबईने नंतरचे सलग तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे आजचा सामना मुंबईसाठी जिंकणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्या आणि पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. पंजाब किंग्जचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर पंजाबचे तगडे आव्हान असणार आहे.
मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलच्या हंगामात दमदार सुरुवात केली. केकेआरविरुद्ध सामना जिंकला. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने गमावले आहेत. हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आजचा सामना मुंबईच्या संघासाठी करो या मरो या स्थितीमध्येच असणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी त्यांचा आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे.
आधीच पराभव अन् आता MI समोर उभे ठाकले संकट! Rohit Sharma आउट? प्रकरण काय?
तर दुसरीकडे पंजाब किंग्ज जबरदस्त खेळी करत आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह, संदीप शर्मा असे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. पंजाब किंग्जची स्थिती मुंबई इंडियन्सपेक्षा बरोबर उलटी आहे. पंजाब किंग्जने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात त्यांच्या पराभव झाला आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
पिच रिपोर्ट
वानखेडेवर आतापर्यंत आयपीएलच्या 125 सामने झाले आहेत. यामध्ये शेवटचा सामना 12 एप्रिल रोजी खेळवला गेला आहे. पहिल्यांदा फलंदाजी केल्यावर या ठिकाणी 171 हा हायस्कोअर झालेला आहे. हे पीच फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे या टॉस जिंकून धावांचा पाठलाग करणे निवडणे योग्य ठरू शकते.
Ro-Hit Man ‘ऑन फायर’; Mumbai Indians साठी केला ‘हा’ ‘विराट’ विक्रम, व्हाल थक्क
येथील लाल मातीच्या पीचवर बॉल बॅट वर चांगल्या प्रकारे येतो. या स्टेडियमची खेळपट्टी धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे जो कर्णधार टॉस जिंकेल तो प्रथम या ठिकाणी गोलंदाजी करणे पसंत करतो. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील धावांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील वातावरण आज मोकळे आणि स्वच्छ राहील. पावसाची शक्यता देण्यात आलेली नाही.






