MI Vs PBKS Live Streaming (फोटो- ट्विटर)
मुंबई इंडियन्सचे पंजाबला 197 रन्सचे टार्गेट
जसप्रीत बुमराहने सोडला प्रभसिमरनचा कॅच
पंजाबचा मुंबईवर 7 विकेट्सने विजय
Tata IPL 2026 MI Vs PBKS Live Updates: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा 24 वा सामना पार पडला. पंजाब किंग्जने प्रथम गोलंदाजी (MI vs PBKS) करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सने क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर 196 रन्स केले आणि पंजाबला 197 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.
पंजाब किंग्जची फलंदाजी
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 197 रन्सचा पाठलाग करण्यासाठी प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्या सलामीवीर म्हणून मैदणात उतरले. प्रियांश आर्या केवळ 18 रन्स करून आउट झाला. प्रभसिमरन सिंहचा सोपा कॅच जसप्रीत बुमराहने सोडला. त्यानंतर प्रभसिमरनने शानदार अर्धशतक केले. कूपर कॉनली 17 रन्स करून आउट झाला. श्रेयस अय्यर 66 रन्स करून आउट झाला. प्रभसिमरन सिंगने नाबाद 80 रन्सची खेळी केली.
पंजाब किंग्जची गोलंदाजी
पंजाब किंग्जकडून पहिली ओव्हर अर्शदीप सिंगने टाकली. त्याने पहिली ओव्हर मेडन ओव्हर टाकली. अर्शदीप सिंगने 2 विकेट घेतल्या. त्याने रियान रिकलटन आणि सूर्यकुमार यादवला आउट केले. सूर्यकुमार यादवचा कॅच युझवेंद्र चहलने पकडला. अर्शदीप सिंगने एकूण 3 विकेट्स घेतल्या. तर शशांक सिंगने 1 विकेट घेतली. तर यान्सने देखील 1 महत्वाची विकेट घेतली. श्रेयस अय्यरने सीमारेषेवर हार्दिक पंड्याचा अप्रतिम असा झेल पकडला.
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी
मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जच्या 2 विकेट्स 45 रन्समध्ये घेतल्या मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरनने 100 रन्सची भागीदारी केली. ए.एम. गझनफरने कूपर कॉनली आणि प्रियांश आर्याची विकेट घेतली. शार्दुल ठाकूरने कर्णधार श्रेयस अय्यरची विकेट घेतली.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी
मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करण्यासाठी रियान रिकलटन आणि क्विंटन डी कॉक सलामीला खेळण्यासाठी आले होते. मात्र रियाल रिकलटन आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही. तो केवळ 2 रन्स करून आउट झाला. त्यानंतर 360 डिग्री फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणार सूर्यकुमार यादव खेळण्यासाठी आला. मात्र तो पहिल्याच चेंडूवर आउट झाला. नमन धीर आणि डी कॉकने मुंबईचा डाव सावरला. 50 रन्सची महत्वपूर्ण पार्टनरशिप दोघांनी केली.
Match 24. 16.3: Deepak Chahar to Marcus Stoinis 4 runs, Punjab Kings 198/3 https://t.co/Fn2dxJ4zYR #TATAIPL | #MIvPBKS — IndianPremierLeague (@IPL) April 16, 2026
क्विंटन डी कॉकने शानदार शतक केले. क्विंटन डी कॉक 109 करून नॉट आउट राहिला. नमन धीर देखील 50 रन्स करून आउट झाला. तर तिलक वर्माने 3 चेंडूत 8 रन्स केले. रदरफोर्ड केवळ 1 रन करून आउट झाला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मुंबईची धावगती थोडी मंदावली असल्याचे पाहायला मिळाले.
MI Vs PBKS Live: मुंबई पलटणची गाडी सुसाट; पंजाबला दिले 197 रन्सचे टार्गेट
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रायन रिकल्टन, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा , हार्दिक पांड्या (कर्णधार – अष्टपैलू), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट.
पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर, मार्क्स स्टॉइनिस, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्को जानसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाक, युझवेंद्र चहल, अर्शर्दीप सिंग.






