MI vs RR IPL 2026 (फोटो- सोशल मिडिया)
आज मुंबई इंडियन्स अन् राजस्थान रॉयल्स आमनेसामने
गुवाहाटी येथे रंगणार आयपीएलचा थरार
हार्दिक पंड्याच्या कामगिरीकडे लक्ष
Tata IPL 2026 Live MI vs RR Updates: आयपीएलचा महासंग्राम सुरू झाला आहे. प्रत्येक सामन्यात चाहत्यांना क्रिकेटचा आनंद मिळताना दिसून येत आहे. आज गुवाहाटी येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात सामना पार पडणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. आजच्या सामन्याची खेळपट्टीचा अंदाज जाणून घेऊयात.
आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सने आपला मागचा सामना गमावला आहे. तर राजस्थान रॉयल्सने दोन्ही सामने जिंकले आहेत. मुंबईचा संघ दोन पैकी एक सामना जिंकला आहे. बरसपारा स्टेडियमचा रिपोर्टबाबत जाणून घेऊयात.
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
बरसपारा क्रिकेट स्टेडीयमची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. या ग्राऊंडवर मोठी धावसंख्या उभी करणे शक्य आहे. प्रथम फलंदाजी करताना 155 ते 165 धावसंख्या अंदाजे आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 145 ते 155 धावसंख्या अंदाजे आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.
IPL 2026 : Hardik Pandya मैदानात कधी परतणार? Mumbai Indians च्या कॅप्टन्सीच्या पेचात मोठी अपडेट
कसे असणार आजचे हवामान?
हवामान विभगाच्या माहितीनुसार आज गुवाहाटीमध्ये पावसाची शक्यता नसल्याचे समोर येत आहे. कमाल तापमान 28 तर किमान तापमान 18 डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज पावसाची कोणतीही शक्यता या सामन्यात नसल्याचे म्हटले जात आहे. कालच्या सामन्यात ईडन गार्डन्सवर पाऊस झाल्यामुळे केकेआर विरुद्ध पंजाब किंग्जमधला सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघाना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला आहे.
मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करत असताना मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. हार्दिक पंड्या त्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवने कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली. मात्र मुंबईच्या संघाला दिल्लीच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला.
MI vs DC Live: दिल्लीने घेतला मोठा निर्णय; टॉस जिंकत पहिल्यांदा…; मुंबईचा संघ तयार
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, रायन रिकलटन , सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड,मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, कॉर्बिन बॉश, जसप्रीत बुमराह.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, रियान पराग (कर्णधार), रवींद्र जडेजा, डॅशुन शनाका, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, रवी बिष्णोई, नांद्रे बर्गर, युधवीर सिंह






