Tata IPL SRH vs RR Live Streaming (फोटो- ट्विटर)
एसआरएचचे आरआरला 217 रन्सचे टार्गेट
इशान किशनने केली 91 रन्सची खेळी
Tata IPL 2026 SRH Vs RR Live Updates: आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. एसआरएचने आरआरला 217 रन्सचे टार्गेट दिले होते. राजस्थान रॉयल्सची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. दरम्यान या सामन्यात एसआरएचने राजस्थानचा 57 रन्सने पराभव केला आहे. साकीब हुसेन आणि प्रफुल हिंगे या दोन युवा गोलंदाजांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेऊन राजस्थान रॉयल्सला सलग 5 व्या विजयापासून रोखले आहे.
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
217 रन्सचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले. मात्र वैभव सूर्यवंशी या मॅचमध्ये एकही रन न करता आउट झाला. तर ध्रुव जुरेल देखील शून्यावर आउट झाला. ल्वान-द्रे प्रिटोरियस देखील एकही रन करू शकला नाही. राजस्थान रॉयल्सचे निम्मे फलंदाज पॉवर प्लेच्या आधीच आउट झाले. त्यानंतर खेळायला आलेल्या रवींद्र जाडेजाने आणि डोनोव्हन फेरेराने राजस्थानचा डाव सांभाळला. दोघांनी 100 पेक्षा जास्त रन्सची पार्टनरशिप केली. डोनोव्हन फेरेरा 69 रन्सवर आउट झाला. रवींद्र जाडेजा 45 रन्सवर आउट झाला. तुषार देशपांडेने 9 चेंडूत 25 रन्सची खेळी केली.
राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी
राजस्थान रॉयल्सने पहिल्या ओव्हरपासून प्रभावी गोलंदाजी केली. जोफ्रा आर्चरने अभिषेक शर्माला 0 व्यावर आउट केले. डोनोव्हन फेरेराने ट्रेविस हेडला आउट केले. संदीप शर्माने इशान किशनला आउट केले. तुषार देशपांडेने हेनरी क्लासेनला आउट केले. जोफ्रा आर्चरने नितीश कुमार रेड्डीची विकेट घेतली. रियान परागने देखील देखील एक विकेट घेतली.
Vaibhav Sooryavanshi ✅
Praful Hinge ✅
Lhuan-dre Pretorius ✅ A dream start for Praful Hinge on his #TATAIPL debut 🧡 Updates ▶️ https://t.co/xGTDdKbXpY#KhelBindaas | #SRHvRR | @SunRisers pic.twitter.com/RKGW3NxM5y — IndianPremierLeague (@IPL) April 13, 2026
एसआरएचची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून एसआरएचला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. मात्र आज अभिषेक शर्मा खातेही उघडू शकला नाही. एकही रन न करता तो आउट झाला. तर ट्रेविस हेड देखील लवकर आउट झाला. 18 चेंडूत 18 रन करून हेड आउट झाला. नंतर एसआरएचची कमान इशान किशनने सांभाळली. केवळ 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. इशान किशन 44 चेंडूत 91 रन्स करून आउट झाला. त्यापाठोपाठ हेनरी क्लासेन देखील 40 रन्स करून आउट झाला. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी 13 चेंडूत 28 रन्स करून आउट झाला. अनिकेत वर्मा 5 चेंडूत 6 रन्स करून आउट झाला. हर्ष दुबे एकही रन न करता नॉट आउट राहिला.
एसआरएचची गोलंदाजी
एसआरएचच्या गोलंदाजांना या मॅचमध्ये सूर गवसल्याचे पाहायला मिळाले. साकीब हुसेनने राजस्थानच्या फलंदाजांची दांडी गूल केली. त्याने यशस्वी जयस्वाल, कर्णधार रियान परागची विकेट घेतली. तर प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीची विकेट घेतली. साकीब हुसेनने डोनोव्हन फेरेराची विकेट घेतली.
SRH Vs RR: हैदराबादमध्ये Ishan Kishan ची रॉयल ‘धुलाई’; राजस्थानला 5 व्या विजयासाठी 217 रन्सची गरज
एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान कलिंगा, झीशान अन्सारी
राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, नितीश राणा.






