Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Novak Djokovic : ‘ऑस्ट्रेलियात मला अन्नातून विष दिलं’; टेनिसचा बादशाह नोवाक जोकोविचच्या आरोपाने जगभरात खळबळ

जगप्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने धक्कादायक दावा केला आहे. 2022 च्या ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी ऑस्ट्रेलियातून डिपोर्ट होण्यापूर्वी विष देण्यात आल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 10, 2025 | 07:43 PM
जगप्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या हत्येचा कट; अन्नातून दिलं होतं विष

जगप्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या हत्येचा कट; अन्नातून दिलं होतं विष

Follow Us
Close
Follow Us:

जगप्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने धक्कादायक दावा केला आहे. 2022 च्या ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी ऑस्ट्रेलियातून डिपोर्ट होण्यापूर्वी विष देण्यात आल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रासह जगभरात खळबळ माजली आहे. जागतिक नंबर वन असलेल्या जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्यात आला आणि त्याने कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड-19 चे लस घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला परत पाठवण्यात आले होते. यावेळी त्याला एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.

“मला काही आरोग्य समस्या होत्या आणि मला जाणवले की मेलबर्नमधील त्या हॉटेलमध्ये, मला असे काही अन्न देण्यात आले होते ज्यामुळे मला विषबाधा झाली होती. त्यानंतर त्याच्या शरीरात शिसे आणि पाराचे अंश आढळले, GQ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हा दावा त्याने केला आहे.

IND W vs IRE W : भारताला संघाला मिळाले पहिले यश, साधूने सारा फोर्ब्सला पाठवले पॅव्हेलियनमध्ये

37 वर्षीय जोकोविचने GQ मासिकाला सांगितले की, मला आरोग्याच्या काही समस्या होत्या. मेलबर्नमधील त्या हॉटेलमध्ये मला काही अन्न दिलं गेलं, त्या अन्नातून मला विष दिलं होतं. सर्बियाला परत आल्यावर मला काहीतरी जाणवलं. मी हे कधीच कोणाला जाहीरपणे सांगितले नाही, पण माझ्या शरीरात ‘जड धातू’चे प्रमाण खूप जास्त असल्याचे निष्पन्न झाले. माझ्या शरीरात शिसे आणि पारा यांचे प्रमाण खूप जास्त होते.

ऑस्ट्रेलियन लोकांबद्दल आदर पण…

हॉटेलचे जेवण हे याचे कारण आहे का असे त्याला विचारले असता त्याने उत्तर दिले की, हा एकमेव मार्ग आहे. रविवारी मोसमातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू होत असताना जोकोविच 11वे ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद आणि विक्रमी 25वे मोठे विजेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात होता. 2022 चा वाद असूनही ऑस्ट्रेलियन लोकांबद्दल आपला कोणताही राग नाही, असे त्याने ठामपणे सांगितले. 12 महिन्यांनंतर तो मेलबर्नला परतला, जिथे त्याने स्पर्धा जिंकली. त्यावेळी तो म्हणाला की, गेल्या काही वर्षांत मी ऑस्ट्रेलिया किंवा जगाच्या इतर भागांमध्ये भेटलेले अनेक ऑस्ट्रेलियन माझ्याकडे आले आणि त्यांनी मला दिलेल्या वागणुकीबद्दल माफी मागितली, कारण त्यावेळी त्यांना त्यांच्याच सरकारकडून त्रास होत होता. आता  सरकार बदलले आहे आणि त्यांनी माझा व्हिसा पुन्हा मिळवून दिला आहे, त्याबद्दल मी खूप आभारी आहे.

Bangladesh Premier League : फलंदाजाने दाखवला रिंकू सिंगचा अवतार, 3 षटकार, 3 चौकार… हरलेला सामना जिंकला

तो पुढे म्हणाला की, मला तिथे राहायला आवडते. मला वाटते की हे माझ्या टेनिस खेळण्याचा आणि त्या देशात राहून मला कसे वाटते याचा मोठा पुरावा आहे. काही वर्षांपूर्वी ज्यांनी मला त्या देशातून हद्दपार केले त्यांना मी कधीही भेटलो नाही. मला त्यांना भेटण्याची इच्छा नाही. मी त्यांना एक दिवस भेटलो तरी चालेल. हात जोडून पुढे जाताना मला आनंद होत असल्याचं त्यांने म्हटलं आहे.

Web Title: Tennis king novak djokovic serious allegation on australia in 2022 he was poisoned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 07:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.