फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बांग्लादेश प्रीमियर लीग : आयपीएल प्रमाणे बांग्लादेशमध्ये सध्या क्रिकेट प्रीमियर लीग सुरु आहे. बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये रंगपूर रायडर्स आणि फॉर्च्यून बरीशाल यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. हा सामना जिंकण्यासाठी रंगपूर रायडर्सला शेवटच्या षटकात २६ धावांची गरज होती. ज्यानंतर नूरुल हसनची तुफानी स्टाइल पाहायला मिळाली. नुरुल हसनची ही झंझावाती फलंदाजी पाहून चाहत्यांना भारतीय क्रिकेट संघाचा आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणारा स्फोटक फलंदाज रिंकू सिंगची आठवण झाली, ज्याने आयपीएलमध्ये यश दयालविरुद्ध ५ षटकार मारून केकेआरला विजय मिळवून दिला.
WHAT A FINISH 🤯
With 26 needed to win, Nurul Hasan smashed 30 off Kyle Mayers in the final over to seal Rangpur Riders a stunning win!https://t.co/GB3LnZFFdp | #BPL2025 pic.twitter.com/ymaxC8emxT
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 9, 2025
बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये रंगपूर रायडर्स आणि फॉर्च्यून बरीशाल यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात फॉर्च्युन बरीशाल संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १९७ धावा केल्या. अखेरच्या षटकात रंगपूर रायडर्सला विजयासाठी २६ धावांची गरज होती. काइल मेयर्स फॉर्च्युन बरीशालसाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी आला असताना त्याच्यासमोर ३१ वर्षीय नुरुल हसन होता. काईलच्या पहिल्या चेंडूवर नुरुलने षटकार ठोकला, त्यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर सलग दोन चौकार मारले. यानंतर तीन चेंडूंवर १२ धावा हव्या होत्या, त्यानंतर नुरुलने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर नुरुलने शेवटच्या २ चेंडूंवर २ चौकार मारून रंगपूर रायडर्सला विजय मिळवून दिला.
𝘼𝙗𝙨𝙤𝙡𝙪𝙩𝙚 𝙘𝙞𝙣𝙚𝙢𝙖! 🍿
Rangpur Riders were all but out of the contest until Skipper Nurul Hasan smashed 30 off the final over to pull off an incredible heist! 😵💫#BPLonFanCode pic.twitter.com/9A7R96fmhU
— FanCode (@FanCode) January 9, 2025
फॉर्च्युन बरीशालने दिलेल्या १९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रंगपूर रायडर्सने २० षटकांत ७ गडी गमावून विजय मिळवला. रंगपूर रायडर्सकडून फलंदाजी करताना इफ्तिखार अहमद आणि खुशदिल शाह यांनी प्रत्येकी ४८ धावांची खेळी केली. अखेरीस नूरुल हसनने अवघ्या ७ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या होत्या. आपल्या खेळीदरम्यान नूरुलने ३ षटकार आणि ३ चौकार लगावले.
युजवेंद्र चहलनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा घटस्फोट! U-19 विश्वचषक विजेत्या संघात होता सामील
फॉर्च्यून बरीशाल संघासाठी फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, फॉर्च्यून बरीशाल संघासाठी काइल मेयर्स याने २९ चेंडूंमध्ये ६९ धावांची खेळी खेळून नाबाद राहिला पण त्याची व्यर्थ ठरली. नजमुल हुसेन शांतो आणि तमीम इक्बाल या दोघांनी प्रत्येकी संघासाठी ४० धावा केल्या.