Good news! The 2030 Commonwealth Games will be held in India, 'this' city has been awarded the honour of hosting the event
The 2030 Commonwealth Games will be held in India : भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान भारताची झोळीत पडला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर याबाबत माहिती दिली. त्यांनी हा देशासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. या प्रतिष्ठित खेळांचे आयोजन करण्याची ही भारताची दुसरी वेळ असणार आहे. यापूर्वी २०१० मध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यशस्वीरित्या नियोजन करण्यात आले होते.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की २०३० चे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादमध्ये पार पडणार आहेत. जयशंकर यांनी लिहिले की “हा केवळ भारतासाठीच नाही तर गुजरातसाठी देखील एक अभिमानाचा क्षण आहे. भारताला जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि प्रतिभेचे केंद्र बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि दूरदृष्टीचे हे परिणाम आहे.” जयशंकर असे देखील म्हणाले की, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन हे भारतासाठी ऑलिंपिकच्या आयोजनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी देखील या प्रसंगी आनंद व्यक्त करताना लिहिले की, “हा गुजरातचा आणि संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाकडून २०३० च्या स्पर्धेसाठी अहमदाबादची प्रस्तावित यजमान शहर म्हणून निवड करण्यात आली. जी राज्याच्या क्रीडा पायाभूत सुविधा आणि वाढत्या क्षमतांचा पुरावा आहे.” तसेच पटेल यांनी पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाची आणि भारताला जागतिक क्रीडा उत्कृष्टतेकडे नेण्याच्या वचनबद्धतेची देखील प्रशंसा केली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासाबाबत बोलायचे झाले तर या स्पर्धेची सुरुवात १९३० मध्ये कॅनडातील हॅमिल्टन येथे झाली होती. त्यावेळी या स्पर्धेला ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हणून ओळखले जात असे. यामध्ये मनोरंजक म्हणजे, ब्रिटिश भारताने त्या पहिल्या हंगामात भाग घेतला नव्हता. भारताने १९३४ मध्ये लंडनमध्ये झालेल्या दुसऱ्या हंगामात प्रथम भाग घेतला होता. आगामी २०३० आवृत्ती या खेळांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधणार आहे.
हेही वाचा : IND vs AUS: कशी असेल पर्थची खेळपट्टी? कोण मारेल बाजी? पहिली झलक समोर आली; वाचा सविस्तर
मिळालेल्या अहवालांनुसार, २०२६ चे राष्ट्रकुल खेळ स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे खेळले जाणार आहेत. ज्यामध्ये ७४ देशांचे ३,००० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यानंतर अहमदाबाद हे २०३० मध्ये राष्ट्रकुल खेळांचे ठिकाण बनणार आहे.