कुलदीप यादव(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS ODI Series : भारतीय क्रिकेट संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बहुप्रतिक्षित तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला पोहकचला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये खेळला जाणार आहे. या सलामीच्या सामन्यापूर्वी, माजी क्रिकेटपटू आणि विश्लेषक आकाश चोप्रा यांनी टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. त्यांनी स्टार स्पोर्ट्सच्या इंस्टाग्राम हँडलवर पर्थमध्ये टीम इंडियाने कोणत्या प्रकारच्या प्लेइंग इलेव्हनला मैदानात उतरायला पाहिजे याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा : ‘तू दुसऱ्यासाठी आला आहेस, ते येत असतील…’, जसप्रीत बुमराहचा पापाराझींशी रागीट Video Viral!
आकाश चोप्राने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माला त्याच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून स्थान दिले आहे. तर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. आकाश चोप्राच्या मते चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरची निवड योग्य आहे. या प्लेइंग इलेव्हनमध्ये अय्यर उपकर्णधार म्हणून देखील काम पाहणार आहे.
यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलला फलंदाजी लाइनअपमध्ये पाचव्या क्रमांकावर उतरण्यास ठरवण्यात आले आहे. ही लाइनअप महत्त्वाची ठरते कारण की, संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडला आहे. आकाश चोप्राने हार्दिक पंड्याऐवजी नितीश कुमार रेड्डीला संघात स्थान दिले आहे. ज्याला आकाश चोप्रा यांनी “जसे की-जसे की” रिप्लेसमेंट असे म्हटले आहे.
आकाश चोप्राने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्पिन बॉलिंगसाठी अष्टपैलू अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान दिले आहे. तथापि, त्याचा सर्वात धक्कादायक निर्णय म्हणजे कुलदीप यादवला संघातून डच्चू देण्यात आला आहे. कुलदीप यादवला अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिके दरम्यान शानदार कामगिरी केली होती.
वेगवान गोलंदाजीला बळकटी देण्यासाठी, आकाश चोप्राने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन वेगवान गोलंदाजांची वर्णी लावली आहे. या संघात हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांचे नाव सामाविष्ट आहे.
रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा १५ सदस्यीय एकदिवसीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित सिंह, मोहम्मद अरदीप सिंह, कृष्णा अरविंद राणा, कृष्णा राणा, कृष्णा राणा, कृष्णा राणा. (यष्टीरक्षक), आणि यशस्वी जैस्वाल.
हेही वाचा : किंग कोहलीची ‘वेडी’ बंधुमाया! गुरुग्रामची मालमत्ता केली मोठ्या भावाच्या नावे; विराट लंडन शिफ्ट होणार?