A new format is born in cricket! Neither Test-ODI, nor T-20; Now the thrill of 'this' format will be played on the field..
Test Twenty20 in cricket : क्रिकेट हा खेळ जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. क्रिकेट या खेळात अनेक बदल हॉट आले आहेत. अजूनही या क्रीडा प्रकारात बदलाचे चक्र सुरूच आहे. १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्नमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर क्रिकेटमध्ये बदल होत आले आहेत. हळूहळू, स्वरूप बदलले आणि क्रिकेटचा उत्साह वाढला आहे. कसोटीनंतर, एकदिवसीय स्वरूप पुढे आला. त्यानंतर टी-२० स्वरूपाचा जन्म झाला. ज्यामुळे क्रिकेट अधिक वेगवान, अधिक रोमांचक आणि प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक बनले आहे. त्यानंतर ‘द हंड्रेड’ आणि ‘टी-१०’ सारख्या नवकल्पनां देखील खेळात प्रवेश मिळाला आणि आता, ‘टेस्ट ट्वेंटी’ नावाचे आणखी एक नवीन स्वरूप खेळात समोर आला आहे.
हेही वाचा : अभिषेक शर्मा-स्मृती मानधनाची लागली लॉटरी! ICC कडून मिळाला खास सन्मान; वाचा सविस्तर
द फोर्थ फॉरमॅटचे सीईओ आणि वन वन सिक्स नेटवर्कचे कार्यकारी अध्यक्ष गौरव बहिरवानी यांनी म्हटले की, कसोटी ट्वेंटी हा क्रिकेटचा एक स्वरूप आहे जो कसोटी आणि टी-२० दोन्ही घटकांना एकत्र आणतो. या स्वरूपात, प्रत्येक संघाला कसोटी सामन्याप्रमाणेच फलंदाजीसाठी दोन संधी असणार आहे. फरक एवढाच आहे की हा फॉरमॅट लहान आणि वेगवान असेल, ज्यामुळे प्रेक्षकांना प्रत्येक क्षणाच्या रोमांचक क्षणात मग्न राहावे लागणार आणि टीव्हीवरील सामना अनुभव अधिक आनंददायी होण्यास मदत होणार आहे.
या फॉरमॅटमध्ये कसोटी आणि टी-२० क्रिकेटचे नियम एकत्र करण्यात आले आहेत. काही नियम कसोटी क्रिकेटमधून घेतले आहेत, तर काही टी-२० मधून, परंतु या नवीन फॉरमॅटला अनुकूल करण्यासाठी त्यात थोडेसे बदल केले आहेत. सामन्याचा निकाल विजय, पराभव, बरोबरी किंवा ड्रॉ अअसण्याची शक्यता आहे. म्हणजेच खेळ केवळ वेगवानच नाही तर निकालाच्या बाबतीत देखील अतिशय रोमांचक असणार आहे.
क्रिकेटमधील दिग्गज देखील या नवीन फॉरमॅटबद्दल उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत. एबी डिव्हिलियर्स, मॅथ्यू हेडन, क्लाइव्ह लॉयड आणि हरभजन सिंग सारखी नावे प्रकल्पाच्या सल्लागार मंडळात समाविष्ट आहेत. जरी कसोटी ट्वेन्टी-२० ने अद्याप अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश झालेला नसला तरी त्यावर काम वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला तीन वेळा बदडलं! आता सलमान आगाची कर्णधारपदावरून सुट्टी? वाचा सविस्तर
एबी डिव्हिलियर्स याबाबत बोलताना म्हणाला की, “या फॉरमॅटची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता ही आहे. ते खेळाडूंना मुक्तपणे स्वतःला व्यक्त करण्याची परवानगी देत असून हे निर्भय असे क्रिकेट आहे, जे त्यांना दोन्ही डावांमध्ये संतुलन राखण्याचे आणि टिकून राहण्याचे आव्हान समोर ठेवते.” तसेच मॅथ्यू हेडन म्हणाला की,”तरुण खेळाडू हे खेळाचे भविष्य आहे म्हणूनच तो या फॉरमॅटमध्ये सामील झाला आहे. हा लांब फॉरमॅट चारित्र्य, कौशल्य, मानसिक आणि शारीरिक ताकदीची परीक्षा पाहणारा आहे. आपण दोन्ही जगातील सर्वोत्तम पाहणार आहोत.”