सलमान अली आघा(फोटो-सोशल मीडिया)
Pakistan team captain Salman Agha : मागील महिन्यात पार पडलेल्या आशिया कप २०२५ (Asia cup 2025)स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला तीन सामन्यात धूळ चारली आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहे. पाकिस्तानने अलीकडेच पहिल्या कसोटीतमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवले, परंतु आशिया कप २०२५ मध्ये भारताविरुद्ध झालेल्या पराभवाच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. ज्यामुळे सलमान अली आघाच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण झाले आहेत. बहुराष्ट्रीय स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामने गमावण्याची ही पाकिस्तानची पहिलीच वेळ ठरली होती. आता कर्णधार सलमान आगाचे पद धोक्यात आले आहे.
हेही वाचा : IND VS AUS : ऑस्ट्रेलियाची आता खैर नाही! ‘रो-को’ने सराव सत्रात मैदानात गाळला घाम;पहा Video
आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाची टी-२० रणनीती बदलण्याच्या विचार असून त्याबाबत आता निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान अली आघा यांना टी-२० कर्णधारपदावरून दूर करण्यात येऊ शकते. शादाब खानला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याची तयारी सुरू असून तो अलिकडेच खांद्याच्या शस्त्रक्रियेतून बरा झाला आहे. शादाब खान पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याने यापूर्वी संघाचा उपकर्णधार म्हणून काम पाहिले आहे. शादाबच्या कर्णधारपदामुळे संघात नवीन ऊर्जा आणि रणनीती येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघ यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेनंतर किंवा नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान शादाब खानला अधिकृतपणे कर्णधार म्हणून नियुक्त केले करण्यात येऊ शकते. पीसीबी संघाच्या तंदुरुस्ती आणि धोरणात्मक गरजांवर आधारित कर्णधारपदाची घोषणा करण्यात येणार आहे. शादाबची कर्णधारपदी नियुक्ती संघातील तरुण खेळाडूंना नवीन मार्गदर्शन आणि नेतृत्व देखील प्रदान करेल अशी आशा आहे.
या बदलाचे प्राथमिक उद्दिष्ट असे की, आगामी टी-२० स्पर्धेत पाकिस्तानला स्पर्धात्मक ठेवणे आणि भारतासारख्या बलाढ्य संघांविरुद्ध त्यांची कामगिरी सुधारणे ही असणार आहे. सलमान अली आघा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पराभवातून धडा घेत संघात सुधारणा करण्यासाठी हे पाऊल आवश्यक मानण्यात येत आहेत. शादाब खान यांच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तान संघ नव्या उर्जेने मैदानात उतरण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सज्ज होत आहे.
हेही वाचा : अभिषेक शर्मा-स्मृती मानधनाची लागली लॉटरी! ICC कडून मिळाला खास सन्मान; वाचा सविस्तर