Women's Day Special: Indian women dominate in Asia; hoisting the tricolor while celebrating their fifth title..
Women’s Day Special : जागतित महिला दिनी भारतीय महिलांनी सपूर्ण देशाला आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय महिलांनी महाराष्ट्राच्या सोनाली शिंगटेच्या नेतृत्वाखाली तेहरान येथे झालेल्या सहाव्या महिला आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुन्हा एकदा विजय मिळवत. या विजयाने भारतीय महिलांनी इतिहास रचला आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इराणला ३५-२२ असा पराभव करत पाचव्यांदा या चषकावर मोहोर उमटवली आहे. फक्त एकदाच दक्षिण कोरिया संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावेल आहे. या विजयात कर्णधार सोनाली शिंगटे, पूजा यांच्यासह साक्षी शर्मा, ज्योती यांची कामगिरी महत्वाची ठरली आहे.
सहाव्या महिला आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत एकूण सात देशाचे संघ सहभागी झाले होते. अ-गटात भारताचा समावेश होता, तसेच या गटामध्ये बांगलादेश, थायलंड व मलेशिया हे संघ होते. साखळी सामन्यात भारताने प्रत्येक सामन्यात आपला दबदबा राखत सर्व सामने जिंकले आणि सर्वोच्च स्थान मिळविले होते. उपांत्य सामन्यात भारताने नेपाळचा ५६-१८ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली होती.
या स्पर्धेचे आयोजनची करण्याची तेहरानला दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. याआधी त्यांच्याकडून प्रथम २००७ मध्ये आयोजन करण्यात आले होते. भारताच्या महिला संघाने या स्पर्धेत दमदार कामगिरी कायम राखत जेतेपदाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने आपली दमदार कामगिरी केली आणि विरुद्ध संघावर एकतर्फी विजय मिळवले आहेत. या स्पर्धेत भारताच्या महिला संघाकडून जोरदार आक्रमणही करण्यात आल्याचे दिसले. पण, ते करत असताना त्यांनी चपळता दाखवत चांगला बचावही केला असल्याचे दिसून आले. भारतीय महिला संघाच्या या दमदार खेळाच्या भरवशावर भारतीय महिलांनी पाचव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे.
कबड्डी जगतात इराणचा संघ हा नेहमीच सर्वात प्रबळ समजला जात आला आहे. पण, भारताच्या महिला संघाने आपली दमदार कामगिरी करत आशियात आपलीच सत्ता असल्याचे दाखवून दिले आहे. भारतीय महिला संघाने या स्पर्धेत कोणत्याही संघाला आपल्यावर वर्चस्व गाजवण्याची कोणतीच संधी दिली नाही. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात भारतीय महिलांनी आपल्या दमदार खेळाने आपणच इथले बॉस असल्याचे दाखवून दिले आहे. भारतीय महिला संघावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा : Birthday Special : Harmanpreet Kaur ने क्रिकेटसाठी केला होता ‘हा’ त्याग; वडिलांनी धरला तीन महिने अबोला अन्..
भारतीय महिलांकडून फायनलमध्येही जोरदार आक्रमण करण्यात आले. तसेच चांगला बचाव देखील केला. त्यामुळेच भारतीय महिला संघाने आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत दमदार विजय खेचून आणला आणि पाचव्यांदा विजेतपद आपल्या नावे केले.