Birthday Special : Harmanpreet Kaur ने क्रिकेटसाठी केला होता 'हा' त्याग; वडिलांनी धरला तीन महिने अबोला अन्..(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Harmanpreet Kaur : भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा आज वाढदिवस आहे. 8 मार्च 2025 रोजी तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. पाच वर्षांपूर्वी याच दिवशी भारतीय महिला संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचली होती. या स्पर्धेत भारतीय संघाला इथपर्यंत पोहोचण्याचे श्रेय केवळ हरमनलाच जाते. परंतु, भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लगाला.
हरमनप्रीत कौरचे क्रिकेट प्रेम जगजाहीर आहे. परंतु, तिची क्रिकेटबाबत एक गोष्ट आहे. जी तिच्या क्रिकेट प्रेमाविषयी आहे. ज्याबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही. याच आवडीमुळे हरमनने असे काही केले होते की, तिच्या वडिलांनी जवळपास तीन महिने हरमनप्रीतसोबत अबोला धरला होता. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरचा जन्म ८ मार्च १९८९ रोजी पंजाबमधील मोगा येथे हरमंदर सिंग भुल्लर आणि सतविंदर कौर यांच्या घरी झाला. हरमनप्रीतच्या वाढदिवसाचे विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनही त्याच दिवशी असतो. त्यांचे वडील हरमंदर सिंग भुल्लर हे स्वतः व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल खेळाडू राहिले आहेत.
हेही वाचा : Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर चाहत्यांचे होणार स्वप्नभंग; रोहित शर्मा करणार ‘या’ गोष्टीला अलविदा..
हरमनप्रीत तिच्या वडिलांकडून क्रिकेटचे बारकावे शिकली आहे. मात्र, एक वेळ अशी येऊन ठेपली की, तीन महिन्यांपासून मुलगी आणि वडिलांमध्ये अबोला निर्माण झाला होता. यात आश्चर्यचकित होण्यासारखे काही नाही. ही गोष्ट खरी आहे असून खुद्द स्टार क्रिकेटर कौरने एका चॅट शोमध्ये याबाबत याचा खुलासा केला आहे. हरमनप्रीत 10 वर्षांहून अधिक काळ झाले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे. तिने 7 मार्च 2009 रोजी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या बुरल येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
चॅट शो दरम्यान, हरमनप्रीतने सांगितले की, क्रिकेट मैदान ते इंडिया कॅप घालण्यापर्यंतचा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. क्रिकेट प्रशिक्षणादरम्यान हरमनप्रीतला अनेक बदलांमधून जावे लागले आहे. उदाहरणार्थ, तिला लांब केसांचा खूप त्रास होता. एके दिवशी तिने केस कापुन टाकले.
हेही वाचा : IND vs NZ final match : मोहम्मद कैफचा सोशल मीडियावर दावा, फायनलच्या सामन्यात हा खेळाडू ठरणार इम्पॅक्ट प्लेयर
केस कापल्यानंतर कौरच्या घरात भूकंप झाला होता. वडिलांना हरमनप्रीतने केलेला हेअरकट अजिबात आवडला नाही. त्यांना खूप राग आला. त्यांनी या कारणावरून हरमनप्रीत कौरशी बोलणे बंद केले होते. हे असे जवळपास ३ महिने चालू राहिले. शेवटी, भविष्यात कधीही केस कापणार नाही, या अटीवर वडिलांनी बोलणे सुरू केले.
हरमनप्रीत कौरने आतापर्यंत एकूण 178 टी-20, 141 एकदिवसीय आणि 6 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये तिने अनुक्रमे 3589, 3803 आणि 200 धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 32, एकदिवसीयमध्ये 31 आणि कसोटीमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत. हरमनप्रीत कौर ही महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी एकमेव भारतीय खेळाडू आहे.