फोटो सौजन्य - ICC
अफगाणिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र : २५ जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश (Afghanistan vs Bangladesh) यांच्यामध्ये शेवटचा T-२० विश्वचषक सुपर-८ चा (T-20 World Cup 2024 Super-8) सामना पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये सुरुवातीला पावसामुळे चाहत्यांची निराशा झाली. त्याचबरोबर अफगाणिस्तानसाठी हा सामना महत्वाचा होता. कारण हा सामना अफगाणिस्तानला जिंकणे अनिवार्य होते. जर हा सामना अफगाणिस्तानने जिंकला नसता तरी ऑस्ट्रेलियाच्या संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला असता. २४ जून रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला अफगाणिस्तानच्या सामन्यावर अवलंबून राहावे लागले. या विश्वचषकामध्ये सुपर-८ च्या सामन्यांमध्ये सर्वात मोठा उलटफेर हा अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत केले.
या सामन्यामध्ये अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या संघाने बांग्लादेशसमोर ११५ धावांचे लक्ष्य उभे केले होते. यामध्ये अफगाणिस्तानचा सलामीवीर फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने महत्वाची खेळी खेळली. त्याने ५५ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. तर इब्राहिम झद्रानने २९ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी संथ गतीने सुरुवात केल्यामुळे आणि पावसामुळे वारंवार सामना थांबवण्यात आल्यामुळे अफगाणिस्तानचा संघ मोठी धाव संख्या उभी करू शकला नाही. अफगाणिस्तानचा गोलंदाजांचा विचार केला तर संघाचा कर्णधार राशिद खानने सर्वाधिक विकेट्स घेऊन बांग्लादेशच्या फलंदाजांना त्रास दिला. राशिदने ४ षटके टाकली यामध्ये त्याने २३ धावा देत ४ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पॅव्हेलियनमध्ये पाठवले. नवीन-उल-हकने सामन्यात चार विकेट्स घेतले तर फजलहक फारुकी आणि गुलबदिन नायब यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला आहे.
बांग्लादेशच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, बांग्लादेशचा सलामी फलंदाज लिटन दासने अर्धशतक ठोकले, त्याने ४९ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. त्यानंतर बांग्लादेशच्या कोणत्याही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही. त्यामुळे बांग्लादेशच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यामध्ये बांग्लादेशच्या संघाची गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर रिशाद हुसेन ३ विकेट्स घेतले तर तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी एक विकेट घेतला.