Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार बदल, युवा खेळाडूला मिळू शकते संधी

टीम इंडिया प्लेईंग 11 : आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा टी 20 सामना होणार आहे. दरम्यान, मागील दोन सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 08, 2023 | 05:59 PM
तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार बदल, युवा खेळाडूला मिळू शकते संधी
Follow Us
Follow Us:

IND vs WI 3rd T20, Team India Playing 11 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज तिसरा टी20 सामना होत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संगाला पराभवाचा सामना करावा लागला होता. फलंदाजीमुळे भारतीय संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात विडिंजने 4 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या टी20 सामन्यात दोन विकेटने विडिंजने बाजी मारली होती. आता तिसरा सामना जिंकून मालिकेत बाजी मारण्याचा विडिंजचा प्रयत्न असेल तर हा सामना जिंकून कमबॅक करण्याचा हार्दिक आणि संघाचा विचार असेल. तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. सलामी जोडी बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय अक्षर पटेल, रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार यांनाही वगळण्यात येण्याची शक्यता आहे.

यशस्वी जायसवाल करू शकतो पदार्पण  

तिसऱ्या टी20 सामन्यात युवा  यशस्वी जायसवाल पदार्पण करण्याची शक्यता आहे. यशस्वी जायस्वाल याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करीत सर्वांनाच प्रभावित केले होते. त्यानंतर कसोटीमध्येही त्याने संधीचे सोनं केले होते. त्यामुळे आता टी 20 मध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. ईशान किशन आणि यशस्वी जयस्वाल सलामीला उतरु शकतात. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल खेळण्याची शक्यता आहे.

टीम इंडियात अनेक बदल होण्याची शक्यता

दोन्ही सामन्यात पराभव झाल्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.  मुकेश कुमार याच्या जागी आवेश खान अथवा उमरान मलिक यांना संधी मिळू शकते.  रवि बिश्नोई याच्या जागी कुलदीप यादवचे पुनरागमन होईल.

मागील सामन्यात हार्दिक आणि अर्शदीपचा भेदक मारा

हार्दिक आणि अर्शदीप यांनी दुसऱ्या सामन्यात भेदक मारा केला होता. दोघांचाही चेंडू स्विंग होत होता. दोन महिन्यानंतर मैदानात उतरलेला चहलही प्रभावी वाटत होता. पण रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार यांनी प्रभावी कामगिरी केली नाही. त्यामुळे या दोघांची सुट्टी होऊ शकते.

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 27 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 9 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे.

भारतीय फलंदाज ढेपाळले – 

पहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना केलाय. पहिल्या सामन्यात टीम इंडिया फक्त 145 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजचे 4 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 152 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजने दोन विकेटने जिंकला. अशा स्थितीत तिसऱ्या वनडे सामन्यात प्लेईंग 11 मध्ये बदलाची शक्यता आहे.

तिसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11- 

ईशान किशन (विकेटकीपर), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन/अक्षर पटेल, कुलदीप यादव, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि युजवेंद्र चहल.

Web Title: There will be a change in the playing 11 of team india in the third t20 the young player may get an opportunity nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2023 | 05:59 PM

Topics:  

  • IND vs WI 3rd T20

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा खोळंबा? चंदीगडमध्ये कसे असेल हवामान, पाहा Weather Report
1

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा खोळंबा? चंदीगडमध्ये कसे असेल हवामान, पाहा Weather Report

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.