फोटो सौजन्य - worldchampionshipoflegends इंस्टाग्राम
भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत-पाक सामना पाहण्यासाठी चाहते वेडे आहेत असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. भारताच्या क्रिकेट संघाचा सामना T२० विश्वचषक २०२४ मध्ये झाला होता. न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर भारताच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे. पुढील २४ तासांमध्ये भारत-पाक दोन्ही संघांमध्ये मैदानावर चकमक पाहायला मिळणार आहे. २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत पाकिस्तान दोन्ही संघ भिडताना दिसणार आहेत. परंतु त्याआधी सुरु असलेल्या माजी क्रिकेटपटूंमध्ये खेळल्या जाणाऱ्या लिजेंड्स लीगच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील संघांमध्ये चकमक होणार आहे.
लिजेंड्स लीगच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चार संघानी उपांत्य फेरी गाठली आहे. यामध्ये भारत चॅम्पियन्स, ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, पाकिस्तान चॅम्पियन्स आणि वेस्ट इंडिज चॅम्पियन्स या संघाचा समवेश आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये ते सुद्धा भारताचे आणि पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये रंगणार आहे तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. हे दोन्ही सामने १२ जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार पहिला सामना ५ वाजता पाहता येणार आहे तर दुसरा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना रात्री ८ वाजता सुरु होणार आहे.
उपांत्य फेरीमध्ये दोन सामने होणार आहेत. यामध्ये पहिल्या उपांत्य फेरीमध्ये पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यांमध्ये जर पाकिस्तानच्या संघाने वेस्ट इंडिजला पराभूत केले तर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरी खेळेल. त्याचप्रमाणे दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर भारत अंतिम फेरीमध्ये जाईल. तर अनुभवी भारत-पाकिस्तान संघांमध्ये हाय-व्होल्टेज सामना चाहत्यांना पाहायला मिळेल. हा सामना १३ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता सुरू होणार आहे.