

आज इंडिया ए अन् श्रीलंका ए यांच्यात सेमीफायनल
वैभव सूर्यवंशी 40 रन्स करून झाला आउट
आशिया कप रायझिंग स्टार्स कप 2026 मध्ये भारताचे नेतृत्व तिलक वर्माकडे
IND A Vs Sl A: सध्या सुरू असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 या स्पर्धेत आज सेमीफायनलचा सामना खेळवला जात आहे. इंडिया ए आणि श्रीलंका ए या दोन संघांमध्ये या स्पर्धेची सेमीफायनल खेळवली जात आहे. दरम्यान भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला विजयासाठी 318 रन्सचे टार्गेट दिले आहे.
इंडिया ए ची फलंदाजी
रायझिंग स्टार्स कप 2026 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये कर्णधार तिलक वर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीने शानदार सुरुवात केली. मागील सामन्यात द्विशतक करणारा वैभव सूर्यवंशी 40 रन्सची खेळी करून आउट झाला.
IND Vs UAE: आता इज्जतीचा सवाल! सेमीफायनलसाठी भारताला विजय गरजेचाच; UAE विरुद्ध कधी भिडणार?
त्यानंतर कर्णधार तिलक वर्मा आणि अभिषेक शर्माने इंडिया ए ची बाजू सांभाळून धरली. अभिषेक शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. तिलक वर्माने त्याला चांगली साथ दिली. अभिषेक शर्माने 78 रन्सची अत्यंत महत्वाची खेळी केली. कुमार कुशाग्र देखील 21 रन्स करून आउट झाला. कर्णधार तिलक वर्माने देखील शानदार अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सांभाळला. रीेंकू सिंगने 12 रन्स केल्या. सुयश शेडगेने 10 रन्स केल्या. हर्षित राणा शून्यावर आउट झाला.
श्रीलंका ए ची गोलंदाजी
आजच्या सेमीफायनलमध्ये श्रीलंका ए संघाने प्रथम गोलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीला आउट केल्यावर त्यांना सहजरीत्या भारताने विकेट मिळू दिल्या नाहीत. लसिथ क्रूसपुल्लेने जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या वैभव सूर्यवंशीला आउट करत श्रीलंकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. रविंदू फर्नांडोने महत्वाच्या 2 विकेट्स पटकावल्या. निपुण धनंजयने देखील 2 विकेट घेतल्या.
इंडिया ए चा संघ: तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्र, आयुष बदोनी, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शद खान, हर्ष दुबे