
Asia Cup Rising Stars 2025: Vaibhav Suryavanshi's storm has struck again! He scored a blistering century in 32 balls against UAE..
Vaibhav Suryavanshi’s explosive century against UAE : वैभव सूर्यवंशीला आता वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याने आपली क्षमता आयपीएलच्या मोट्या व्यासपीठावर सिद्ध केली आहे. आता तो पुन्हा एकदा चर्चेत अला आहे. त्याने आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये इतिहास रचला आहे. वैभवने युएई विरुद्ध फक्त ३२ चेंडूत शतक झळकवले आहे. त्याच्या शतकाच्या जोरवार भारत अ संघाने ४ बाद २९७ धावांचा डोंगर उभा केला आहे. वैभव आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत सर्वात जलद शतक करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या शतकासह त्याने एक विशेष कामगिरी केली आहे. वैभव सूर्यवंशी आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा जगातील चौथा खेळाडू बनला आहे.
वैभव सूर्यवंशीने प्रथम फक्त १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने आपली तीच लय कायम ठेवत ३२ चेंडूत आपले शतक देखील पूर्ण केले. वैभव सूर्यवंशी ४२ चेंडूत १४४ धावांवर माघारी परतला. या दरम्यान, वैभवने ११ चौकार आणि १५ षटकार मारले आहेत. १४ व्या वर्षी, वैभव या स्पर्धेत शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू देखील बनला आहे. वैभव भारत अ संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाजही ठरला आहे.
हेही वाचा : IND vs SA 1st Test : पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे! दिवसाअखेर गिल आर्मीचा स्कोअर 1 बाद 37 धावा
दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात भारत अ संघाने २० षटकांत ४ विकेट गमावून २९७ धावांचा डोंगर उभा केला आहे. कर्णधार जितेश शर्माने देखील ३२ चेंडूत स्फोटक ८३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ८ चौकार आणि ६ षटकार लगावले आहे. युएईला आता विजयासाठी २९८ धावा कराव्या लागणार आहेत.
भारत अ: प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (यष्टीरक्षक/कर्णधार), रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुर्जपनीत सिंग, सुयश शर्मा
संयुक्त अरब अमिराती : अलिशान शराफू (कर्णधार), सय्यद हैदर (यष्टीरक्षक), सोहेब खान, मयंक राजेश कुमार, हर्षित कौशिक, अयान अफजल खान, अहमद तारिक, मोहम्मद अरफान, मोहम्मद फराजुद्दीन, मोहम्मद रोहिद खान, मोहम्मद जवादुल्ला