Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिद्दीचा विजय! इकडे अफगाणिस्तानचे स्वप्न साकार अन् तिकडे काबूलमध्ये विजयोत्सव; क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांत अश्रू

अफगाणिस्तान संघाने तेच केले जे पाकिस्तानचे स्वप्नही पाहत होते. त्याने प्रथम न्यूझीलंड, नंतर ऑस्ट्रेलिया आणि आता बांगलादेशचा पराभव केला आणि T20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. विजयानंतर त्यांच्या खेळाडूंना अश्रू अनावर झाले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघाने आपले जीवन समर्पित केले होते. इकडे अफगाणिस्तानचे स्वप्न सत्यात उतरले तिकडे काबूलमध्ये विजयोत्सव साजरा झाला.

  • By युवराज भगत
Updated On: Jun 25, 2024 | 07:07 PM
Afghanistan team Victory of stubbornness

Afghanistan team Victory of stubbornness

Follow Us
Close
Follow Us:

किंग्सटाउन : प्रतिकूलतेच्या विरुद्ध यशाच्या प्रवासात आपल्या क्रिकेट इतिहासाचे सोनेरी पान लिहून, अफगाणिस्तानने T20 विश्वचषक 2024 सुपर आठ टप्प्यांतील सामन्यात डकवर्थ लुईस प्रणालीचा वापर करून बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव करून प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला.  हा अफगाणी खेळाडूंचा विजय म्हणजे जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेणारा होता. कारण अपुरी साधने, देशातील विचित्र वातावरण जे सर्व जगाला माहिती आहे, तिथे आपली आवड जिवंत ठेवत या खेळात नैपुण्य प्राप्त करणे फार मोठी कामगिरी आहे. 18व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नवीनुल हकने तस्किन अहमदची विकेट घेताच स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांचे डोळे भरून आले.

अफगाणिस्तानचा विजयानंतरचा जल्लोष

'𝘞𝘦 𝘩𝘢𝘷𝘦 𝘱𝘳𝘰𝘷𝘦𝘥 𝘰𝘯𝘦 𝘱𝘦𝘳𝘴𝘰𝘯 𝘷𝘦𝘳𝘺 𝘳𝘪𝘨𝘩𝘵' 👏

Rashid Khan reflects on Afghanistan's iconic entry into the semi-finals 👊#T20WorldCup #AFGvBANhttps://t.co/RJonpSrjtF

— ICC (@ICC) June 25, 2024

क्रिकेट खेळण्यासाठी अपुऱ्या साधने अन् तरीही मोठी कामगिरी

राजकीय अस्थिरता आणि युद्धाच्या भीषणतेचा सामना करणाऱ्या आणि सरावासाठी स्वत:चे मैदानही नसलेल्या देशाच्या संघाने ही कामगिरी केली. या रोमांचक सामन्यात प्रत्येक क्षणी फासे बदलत राहिले, पण शेवटी विजय राशिद खानच्या योद्ध्यांच्या नावे झाला ज्यांनी या विजयासह ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गजालाही स्पर्धेतून बाहेर केले. आता उपांत्य फेरीत 27 जून रोजी अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार असून भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

बांगलादेशच्या गोलंदाजांनी धावगती रोखली

11व्या षटकात हुसेनच्या गोलंदाजीवर झाद्रानने (29 चेंडूत 18 धावा) विकेट गमावल्याने बांगलादेशला यश मिळाले. विकेटने मिळालेल्या मदतीचा पुरेपूर फायदा घेत बांगलादेशच्या गोलंदाजांनी धावगती वाढू दिली नाही. तस्किन अहमदने गुरबाजला मेडन ओव्हर टाकले, त्यानंतर शकीब अल हसनने पुढच्या षटकात फक्त तीन धावा दिल्या. गुरबाजने 14व्या षटकात दोन चौकारांसह 13 धावा केल्या. मुस्तफिझूर रहमान आणि हुसैन यांनी दहा चेंडूंत तीन बळी घेत अफगाणिस्तानची मोठी धावसंख्या उभारण्याचे मनसुबे उधळले. कर्णधार राशिदने अखेरच्या षटकात दोन षटकार मारत संघाला 100 धावांच्या पुढे नेले. कॅरिबियन ते काबूलपर्यंतच्या क्रिकेटप्रेमींना रोमांचित करणाऱ्या या कामगिरीचा अंदाज क्रिकेट पंडितांनाही करता आला नाही.

स्वप्न सत्यात अन् विजयाचा आनंद काबुलपर्यंत

THIS is what it means 🥹#T20WorldCup #AFGvBAN pic.twitter.com/wOAiJoWjjK

— ICC (@ICC) June 25, 2024

पाच गड्यांच्या मोबदल्यात 115 धावांवर रोखले

तत्पूर्वी, बांगलादेशच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत अफगाणिस्तानला पाच गड्यांच्या मोबदल्यात 115 धावांवर रोखले. लेगस्पिनर रिशाद हुसेनने 26 धावांत तीन बळी घेतले. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजही मोकळेपणाने खेळू शकला नाही आणि त्याने 55 चेंडू खेळून 43 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने बांगलादेशचा डाव 17.5 षटकांत 105 धावांत गुंडाळला. राशिद खानने 23 धावांत चार तर वेगवान गोलंदाज नवीनुल हकने 26 धावांत चार बळी घेतले.

सलामीच्या जोडीच्या जोरावर विजय

बांगलादेशसाठी लिटन दासने (नाबाद 54) एकट्याने गड राखला. पावसामुळे अनेकवेळा खेळ थांबला. अफगाणिस्तानने आतापर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सलामीच्या जोडीच्या जोरावर विजय मिळवला आहे आणि आजही तीच गोष्ट कायम राहिली. गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी 59 धावांची भागीदारी केली तर फजलहक फारुकी आणि नवीनुलने नव्या चेंडूवर विकेट घेतल्या.

Web Title: Victory of stubbornness the story of that dream of afghanistan which brought tears to the eyes as soon as it was fulfilled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2024 | 06:55 PM

Topics:  

  • Afghanistan vs Bangladesh
  • T20 World Cup 2024

संबंधित बातम्या

AFG vs BAN: बांगलादेशने ‘करो या मरो’ सामन्यात अफगाणिस्तान दिले १५५ धावांचे आव्हान; कोण पोहचणार सुपर-४ मध्ये?
1

AFG vs BAN: बांगलादेशने ‘करो या मरो’ सामन्यात अफगाणिस्तान दिले १५५ धावांचे आव्हान; कोण पोहचणार सुपर-४ मध्ये?

सुर्याचा ऐतिहासिक कॅच, विराटची दमदार खेळी! या दिनी भारताच्या संघाने 11 वर्षानंतर जिंकला विश्वचषक
2

सुर्याचा ऐतिहासिक कॅच, विराटची दमदार खेळी! या दिनी भारताच्या संघाने 11 वर्षानंतर जिंकला विश्वचषक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.