Vinesh Phogat Rejected PM Narendra Modi's Phone Call after Disqualification from Paris Olympic 2024
Vinesh Phogat Rejected PM Narendra Modi’s Phone Call : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला अंतिम सामन्यात अपात्र ठरवल्यानंतर भारताच्या पदकाच्या आशा मावळल्या. यावेळी संपूर्ण देश शोकाकुल झाला होता. याचे कारणही अगदी तसेच होते. अगदी पदकाच्या जवळ पोहचलेल्या विनेशला या घटनेने कोणतेही पदक मिळणार नव्हते विनेशने दमदार कामगिरी करीत अंतिमफेरी गाठली होती. परंतु, अपात्र ठरवल्यानंतर सर्व कष्ट वाया गेले. तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली, आणि रौप्य पदकाची मागणी देखील केली होती. आता यासंबंधी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विनेशने सांगितले की मला पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) फोन आला होता परंतु मी तो नाकारला.
काय म्हणाली विनेश पाहा
Shocking revelation by our Wrestling icon Vinesh Phogat!
PM Narendra Modi uses our athletes as his PR assets. He calls them and sends multiple cameraman to record the conversation.
After this, it goes through editing, and then they circulate it on social media.
Vinesh… pic.twitter.com/yN7vt5RTro
— Ravinder Kapur. (@RavinderKapur2) October 2, 2024
पंतप्रधानांचा काॅल आला पण नाकारला
विनेशने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मी अंतिम फेरीपर्यंत पोहचले परंतु वजन अधिक असल्याचे कारण देत मला ऑलिम्पिक संघटनेने अपात्र ठरवले. या स्पर्धेतून बाद ठरवल्यानंतर माझी अवस्था अत्यंत वाईट होती. मी वजन कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले परंतु ते अपयशी ठरले. शेवटी मी शरीरातील रक्त काढले परंतु ते सुद्धा अपुरे ठरले यानंतर मला हाॅस्पिटलमध्ये भरती करावे लागले. माझ्या कोचला सुद्धा माझी भीती वाटत होती. माझी अवस्था अत्यंत खराब होती त्यानंतर मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला. परंतु तो मी नाकारला.
माझ्या मेहनतीची आणि भावनांची अशी खिल्ली होताना
पंतप्रधान मोदींचा फोन आला तेव्हा मी हाॅस्पिटलमध्ये होती. आणि मला फोन आला तेव्हा सांगण्यात आले तुमच्याबरोबर फोनवर बोलताना कोणीही नसणार, एक व्हिडीओ शूटसाठी मनुष्य असणार त्यानंतर तुमच्याबरोबर सुरक्षारक्षक असणार असे असताना माझ्या टीमचे कोणीही तुमच्याबरोबर नसणार असे सांगण्यात आले. आता या सर्वानंतर मी सांगितले की, माझ्या टीममधील जर कोणीही नसणार तर मी बोलणार नाही, तसेच माझ्या मेहनतीचा आणि भावनांची सोशल मीडियावर याप्रकारे मी खिल्ली होऊ देणार नाही. तुम्हाला माझ्याप्रती सहानुभूती असेल तर प्रायव्हेटली बोला, सोशल मीडियावर टाकायची काहीही गरज नाही. त्यामुळे मी तो फोन स्वीकारणे कंम्प्लेटली नाकारले. मागील दोन वर्षांचा मी नक्कीच हिशोब त्यांच्याकडे मागेन याचीही त्यांना भीती असेल त्यामुळे त्यांनी माझ्या अटी मान्य केल्या नाहीत.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी
उपांत्य फेरीत विनेश फोगटने क्यूबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला. तिच्या श्रेणीतील पहिल्या सामन्यात तिचा सामना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि जागतिक विजेता जपानच्या युई सुसाकीशी झाला. विनेशने सुसाकीचा 3-2 असा पराभव केला होता. त्यानंतर तिने इतिहास रचत अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र आता सर्वांच्या पदरी निराशा आली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमधील विनेशचा प्रवास
प्री-क्वार्टर फायनलमध्ये विनेशने जपानच्या ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला. सुसाकी ही चार वेळा विश्वविजेती आहे आणि टोकियो ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती सुसाकीने तिचे सर्व 82 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. पण, विनेशने स्वतःच्या युक्तीने सुसाकीचा पराभव केला. सुसाकी कुस्तीमधील टेक-डाउन मॅन्युव्हर्समध्ये तज्ज्ञ आहे. सुसाकीनेही विनेशविरुद्ध त्याचाच वापर केला. पण तिची चाल उलटली कारण विनेशनेही तीच युक्ती वापरून आघाडी घेतली आणि विजय मिळवला.
कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंहविरोधात केले होते आंदोलन
विनेश फोगाटसह बजरंग पुनिया या कुस्तीपटूंनी कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंहविरोधात जोरदार आंदोलन केले होते. याचे कारण संपूर्ण देशाला माहिती आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप अनेक महिलांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात केल्यानंतर विनेश फोगाटने पुढाकार घेत याविरोधात जोरदार आवाज उठवला होता, यामध्ये तिने भाजप सरकारवर सडकून टीका केली होती. तेव्हापासून भाजप आणि कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्यातील विस्तव विझता विझत नसल्याचे पाहायला मिळाले होते.