Liverpool heartbreaking scene! Crazy car driver crashes into victory parade! Football fans crushed, watch video
Liverpool heartbreaking scene : ब्रिटनमधील लिव्हरपूल शहरातून धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. लिव्हरपूल फुटबॉल क्लबच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी फुटबॉल चाहते रस्त्यावर विजयी परेड काढत होते. त्यानंतर अचानक एका कार चालकाने रस्त्यावरील चाहत्यांना चिरडले. सद्या ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही तूफान व्हायरल होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी लिव्हरपूल शहरात फुटबॉल चाहते प्रीमियर लीग ट्रॉफी जिंकून आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा अचानक एक कार तिथे आली आणि तिने ४७ लोकांना चिरडले. या अपघातामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरम्यान, जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : IPL 2025 : ‘मला टी-२० संघात परतायचे आहे आणि माझ्या…’, KL Rahul ने स्पष्ट केले भविष्यातील मनसुबे..
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी स्थानिक वेळेनुसार ६ वाजण्याच्या सुमारास वॉटर स्ट्रीटवर एका कारने येऊन अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. या प्रकरणामध्ये ५३ वर्षीय कार चालक आरोपीला अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या परेडमध्ये तब्बल १० लाख लोक सहभागी झाले होते.
या घटनेवर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे की, आरोपी हा एक गोरा माणूस आहे, जो एक ब्रिटिश नागरिक आहे. तो लिव्हरपूल परिसरातील आहे. आज रात्री घडलेल्या घटनेबद्दल कोणतेही अंदाज लावू नका. असे आम्ही लोकांना आवाहन करत आहोत. तसेच, कोणतेही त्रासदायक व्हिडिओ किंवा चित्र ऑनलाइन शेअर करू नका असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
हे ईश्वर!
लिवरपूल में एक कार ने सड़क पर पैदल लोगों को इस तरह कुचला ! pic.twitter.com/jCRExtQh6J
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) May 26, 2025
त्याच वेळी, पंतप्रधान केयर स्टारमर यांनी या अपघाताचे वर्णन धक्कादायक असे केले आहे. ते म्हणले की, लिव्हरपूलमधील चित्रे भयानक आहेत. जखमींसोबत माझ्या संवेदना आहेत. मला घटनेची संपूर्ण माहिती दिली जात आहे. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी पोलिसांना तपास करण्यासाठी आवश्यक वेळ आणि जागा उपलब्ध करून द्यावी.
हेही वाचा : PBKS vs MI : जोश इंग्लिशच्या खेळीने साधला गुणतालिकेत पहिल्या स्थानावर निशाणा! मुंबईला 7 विकेट्सने PBKS केले पराभूत
तसेच लिव्हरपूल रिव्हरसाइडचे खासदार किम जॉन्सन म्हणाले की, मला मनापासून आशा आहे की अपघातातील सर्व लोक सुरक्षित असतील आणि लवकरच ते त्यांच्या कुटुंबियांकडे घरी पोहोचतील. तसेच, लिव्हरपूल फुटबॉल क्लबच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले की, आम्ही पोलिसांच्या संपर्कात आहोत. आज संध्याकाळी ट्रॉफी परेड दरम्यान वॉटर स्ट्रीटवर घडलेल्या एका घटनेची आम्ही तक्रार केली आहे. या घटनेने प्रभावित झालेल्या सर्वांसोबत आमची प्रार्थना आहेत.